IMPIMP

Blood In Urine | यूरिनमध्ये रक्त येणे ‘या’ जीवघेण्या आजाराचा आहे संकेत, दुर्लक्ष करणे पडेल महागात!

by nagesh
Blood In Urine | blood in urine could be sign of bladder cancer toilet issues hyperplasia urinary tract infection

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – शौचसंबंधीच्या समस्यांकडे (Defecation Problem) अनेकदा लज्जेस्तव दुर्लक्ष केले जाते आणि लोक त्यांच्या समस्या कोणालाही सांगण्यास घाबरतात. या वैयक्तिक समस्यांकडे दुर्लक्ष करणे कधीकधी त्रासदायक ठरू शकते (Blood In Urine). त्यांच्यावर वेळीच उपचार न केल्यास गंभीर आजार होऊ शकतात. वेळोवेळी तपासणी करत राहीले पाहिजे जेणेकरून वेळीच अशा गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकाल आणि चांगल्या उपचाराने बरे होऊ शकता (Blood In Urine).

ब्रिटनच्या सुप्रसिद्ध डॉक्टर मरियम स्टॉपर्ड (Dr. Miriam Stoppard) यांच्या मते, काही लोकांच्या लघवीमध्ये रक्त येते (Blood In Urine), जे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते, त्यामुळे लघवी करताना प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे.

कोणत्या रोगाचे लक्षण (Which Disease Is A Sign Of)

डॉ. मिरियम स्टॉपर्ड यांनी Mirror.co.uk वर एक लेख लिहिला. यात त्यांनी लिहिले की, माझ्या एका मित्राने घाबरून मला फोन केला आणि सांगितले की, त्याच्या लघवीत रक्त येत आहे, जे एखाद्या आजाराचे लक्षण आहे. म्हणून मी त्याला विचारले की त्याने बीटरूट (Beetroot) खाल्ले आहे का? तर त्याने उत्तर दिले, होय. मग मी त्याला सांगितले की बीटरूटमुळे, लघवीचा रंग कधीकधी गुलाबी होतो, जो रक्तासारखा दिसतो.

मी त्याला समजावून सांगितले की बीटरूटचा रंग लाल आहे, जो लघवीमध्ये त्याच प्रमाणात पसरतो. जर ते रक्त असेल तर ते गुठळ्यांसारखे दिसून येईल आणि गंभीर आजाराचे लक्षण (Symptoms Of Serious Illness) असेल. अशा प्रकरणात लघवी, प्रोस्टेट किंवा किडनी कर्करोगाच्या चाचण्या केल्या जातात, त्यानंतर खरी गोष्ट बाहेर येते.

ब्लॅडर कॅन्सरचे (Bladder Cancer) सर्वात सामान्य लक्षण म्हणजे लघवीमध्ये रक्त येणे, ज्याला हेमॅटुरिया (Haematuria) म्हणतात. इम्पीरियल कॉलेज लंडनच्या अनिका मदान यांच्या मते, ब्लॅडर कॅन्सर असलेल्या सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये ही समस्या दिसून येते.

प्रत्येक व्यक्तीला कॅन्सर असेल, हे आवश्यकही नाही

ज्या व्यक्तीच्या लघवीमध्ये रक्त येते त्याचा अर्थ असा नाही की त्याला ब्लॅडर कॅन्सर आहे.
याची इतरही काही कारणे असू शकतात (Symptoms Of Blood In Urine).
हे वाढलेले प्रोस्टेट, मूत्रमार्गात संसर्ग (यूटीआय) किंवा जड व्यायामामुळे देखील असू शकते.

यूटीआयची लक्षणे (Symptoms Of UTI) लघवीमध्ये वेदना, लघवीचा रंग बदलणे, वारंवार लघवी होणे, लघवी रोखू न शकणे इत्यादी असू शकतात.
दीर्घकाळ धावणे किंवा पोहणे यासारख्या व्यायामामुळेसुद्धा लघवीत रक्त येऊ शकते. ते सहसा 1-2 दिवसात बरे होते.

लघवीमध्ये रक्त काही औषधे किंवा विशिष्ट पदार्थांच्या सेवनाने देखील येऊ शकते.

जर कोणी बीट, ब्लॅकबेरी किंवा लाल अन्न खात असेल तर काहीवेळा त्याच्या लघवीचा रंग गुलाबी किंवा लाल असू शकतो.
मासिक पाळीच्या (Menstruation) वेळी योनीतून रक्तस्त्राव झाल्यामुळेही असे होऊ शकते.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Blood In Urine | blood in urine could be sign of bladder cancer toilet issues hyperplasia urinary tract infection

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Baby Care In Summer | उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांची काळजी करणे आवश्यक; अशी घ्या काळजी

Drink Water Before Brushing | सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापुर्वी पाणी प्यावे कि नाही?; जाणून घ्या नेमकं सत्य काय

Baby Care In Summer | उन्हाळ्याच्या दिवसात लहान मुलांची काळजी करणे आवश्यक; अशी घ्या काळजी

Related Posts