IMPIMP

Corona Vaccine | अलर्ट ! कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 10 लक्षणे दिसताच व्हा सावध, धोक्याचा आहे संकेत

by nagesh
Corona Vaccine | 10 symptoms after getting the corona vaccine side effects

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Corona Vaccine | कोरोनाची प्रकरणे आता कमी होत आहेत. परंतु कोरोना अजून संपलेला नाही. यासाठी लसीकरण सर्वात महत्वाचा उपाय आहे. व्हॅक्सीनचे (Corona Vaccine) गंभीर साईड-इफेक्ट होत नसले तरी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका ट्विटच्या माध्यमातून सावध केले आहे की, कोविड-19 व्हॅक्सीन घेतल्याच्या 20 दिवसांच्या आत होणार्‍या लक्षणांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. या लक्षणांबाबत जाणून घेवूयात…

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

ही आहेत सामान्य लक्षणे

व्हॅक्सीन घेतल्यानंतर धडधड जाणवणे, हलका ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी सूज आणि हलकी वेदना, अंगदुखी आणि थकवा हे सामान्य साईड-इफेक्ट आहेत. यास घाबरण्याची आवश्यता नाही

ही लक्षणे आढळल्यास व्हा सावध

1 श्वास घेण्यास त्रास

2 छातीत वेदना

3 उलटी होणे किंवा सतत पोटदुखी

4 अस्पष्ट दिसणे किंवा डोळ्यात वेदना

5 जास्त किंवा सतत डोकेदुखी

6 शरीराराच्या एखाद्या अवयवात कमजोरी

7 स्पष्ट कारणाशिवाय सतत उलटी होणे

8 झटका येणे (उलटीसह किंवा उलटीशिवाय, मागील रेकॉर्ड नसताना)

9 इंजेक्शनच्या ठिकाणी त्वचेवर रक्ताची छोटी किंवा मोठी निशाणी

10 इतर लक्षण किंवा स्थिती जी चिंतेचा विषय आहे.

वरील लक्षणे 20 दिवसाच्या आत आढळून आल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क करा. नवनवीन व्हेरिएंटपासून वाचण्यासाठी लसीकरण खुप आवश्यक असल्याने सर्वांनी डोस घेतला पाहिजे.

Web Title : Corona Vaccine | 10 symptoms after getting the corona vaccine side effects

Related Posts