IMPIMP

Dengue-Viral Fever | डेंग्यू आणि व्हायरल तापामधील फरक असा ओळखावा, जाणून घ्या लक्षणं, तज्ज्ञ डॉक्टरांची माहिती

by sachinsitapure

नवी दिल्ली : Dengue-Viral Fever | डेंग्यूचे रुग्ण सध्या वाढलेले आहेत. पण व्हायरल ताप कोणता आणि डेंग्यूचा ताप कोणता हे ओळखणे कठीण असते. कारण यांची सुरुवातीची लक्षणे सारखीच असतात. डेंग्यूची लक्षणे वेळीच ओळखल्याच धोका कमी होतो. अनेकदा डेंग्यू तापाला व्हायरल ताप समजून गांभिर्याने पाहिले जात नाही, आणि समस्या वाढते. डेंग्यूची लक्षणे जाणून घेऊया. (Symptoms Of Dengue)

डेंग्यू ताप आणि विषाणूजन्य तापाच्या लक्षणांमध्ये फरक

* विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू या दोन्हींमध्ये माणसाला ताप येतो. तो व्यक्तीनुसार कमी-अधिक असू शकतो.
* डेंग्यू तापात एखाद्याला तीव्र डोकेदुखी आणि रेट्रो-ऑर्बिटल वेदना म्हणजेच डोळ्यांच्या मागे वेदना होतात.
* डेंग्यू तापाला ब्रेकबोन फिव्हर असेही म्हणतात. यामध्ये व्यक्तीच्या स्नायू आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात.
* ही दोन्ही लक्षणे सामान्य तापात फारशी दिसत नाहीत. त्यांच्या मदतीने तुम्ही सामान्य ताप आणि डेंग्यू ताप यांच्यात फरक करू शकता.
* काही खाल्ल्यानंतर भूक न लागणे किंवा उलट्या होणे हे देखील एक लक्षण आहे.
* काही लोकांना डेंग्यूमध्ये छातीवर, पाठीवर किंवा शरीराच्या इतर भागांवर लाल रंगाचे ठसे उमटतात.
* कधीकधी नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव देखील होऊ शकतो.

लक्षणे आढळल्यास काय कराल –
डेंग्यूची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. जास्तीत जास्त पाणी प्या.

Avinash Bhosale Bail Granted | पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना जामीन मंजूर

Related Posts