IMPIMP

Diabetes | डायबिटीजच्या रूग्णांनी कधीही करू नये ‘या’ 5 लक्षणांकडे दुर्लक्ष; मोठ्या समस्येचा आहे संकेत, जाणून घ्या

by nagesh
Diabetes | diabetes patient mistakes blood sugar levels diet and lifestyle

सरकारसत्ता ऑनलाइन डायबिटीज (Diabetes) एक सामान्य आजार आहे परंतु तो नियंत्रित ठेवेणे सोपे नाही. डायबिटीजच्या रूग्णांना खाण्या-पिण्यासह संपूर्ण जीवनशैलीकडे लक्ष द्यावे लागते. ब्लड शुगर वाढल्यानंतर रूग्णांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. ब्लड शुगर वाढणे (Diabetes) किंवा कमी झाल्यास काही लक्षणे जाणवतात ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

– ब्लड शुगर वाढल्याचे संकेत
ब्लड शुगर जेव्हा वाढते तेव्हा झोप येत नाही, खुप तहान लागते, अस्पष्ट दिसते, वारंवार लघवीला येते.

– Blood sugar कमी झाल्याचे संकेत
ब्लड शुगर कमी झाल्यास थरथरणे, भूक लागणे, घाम येणे, अस्वस्थता आणि चिडचिडेपणा जाणावतो.

या लक्षणांवर लक्ष ठेवण्यासह टाईप 2 डायबिटीजच्या रूग्णांनी या 5 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये…

1. पायावर झालेली जखम किंवा कापणे –
पयाची जखमी भरून येत नसेल तर दुर्लक्ष करू नका. हा न्यूरोपॅथीचा संकेत असू शकतो. यामध्ये मज्जासंस्थेचे नुकसान होते, या काळात तळव्यात सुई टोचल्यासारखे जाणवते, हात-पाय बधीर होतात, यामुळे शरीरात इन्फेक्शन पसरू शकते.

2. डोळ्यांखाली निळे डाग –
डायबिटीजचा डोळ्यांवर खूप परिणाम होतो. डायबिटिक रेटिनोपॅथी, एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये ब्लड ग्लूकोजचा स्तर वाढल्याने रेटिनाच्या रक्त वाहिन्यांचे नुकसान होते. यामुळे दृष्टी जाण्याचा धोका असतो. याची सुरूवातीची स्पष्ट लक्षणे नाहीत. जस-जसे वाढते, डोळ्यांखाली निळे डाग वाढतात.

3. कमजोरी किंवा शरीराचा एक भाग बधीर होऊ शकतो –
डायबिटीज नसलेल्यांच्या तुलनेत डायबिटीजच्या रूग्णांमध्ये स्ट्रोकची शक्यता 1.5 पट जास्त असते. मेंदूपर्यंत रक्त पोहण्यात अडचण येते तेव्हा स्ट्रोक होतो. याशिवाय डबल दिसणे, चालण्या-फिरण्यास अडचण, बोलताना अवघड वाटणे, डोकेदुखी, चक्कर येणेसुद्धा स्ट्रोकचे लक्षण आहे. यासाठी आहारासह फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीवर लक्ष द्या.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

4. व्यवस्थित ऐकू न येणे –
जर ब्लड शुगर सतत वाढत असेल किंवा कमी होत असेल तर याचा परिणाम शरीराच्या अनेक अवयवांवर होतो. ज्यामध्ये कानांचा सुद्धा समावेश आहे.
रक्त वाहिन्यांचे नुकसान झाल्याने कमी ऐकू येते.

5. आवडत्या अ‍ॅक्टिव्हिटीतील रस नष्ट होणे –
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, डायबिटीज आणि डिप्रेशनमध्ये मोठा संबंध आहे.
डिप्रेशनमुळे औदासिन्य आणि दिवसभरातील अ‍ॅक्टिव्हिटीमधील आवड कमी होऊ लागते.
इतके की आवडीचे काम करण्यातही मन लागत नाही.

Web Title :-  Diabetes | type 2 diabetes symptoms high and low blood sugar serious complication

हे देखील वाचा :

Pune Crime | ब्लॅक मनी व्हाईट करु देण्याच्या बहाण्याने 1 कोटीची फसवणुक करणार्‍या चौघांना अटक

PM Modi’s Birthday | ‘PM मोदींच्या वाढदिवशी लसीकरणाचा नवा विक्रम; 2 कोटींचा आकडा गाठला

PMC 7th pay Commission | 7 व्या वेतन आयोगावरून सर्वसाधारण सभेत ‘नरम नोकझोंक’

Related Posts