IMPIMP

Essential Supplements For Women | महिलांनी 30 च्या वयात आवश्य घेतले पाहिजेत ‘हे’ 5 सप्लीमेंट्स

by nagesh

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Essential Supplements For Women | शरीराला पूर्णपणे निरोगी ठेवण्यात संतुलित खाण्या-पिण्याची (Balanced Diet) महत्वाची भूमिका असते. मात्र वय वाढण्यासह शरीराची गरज सुद्धा वाढत जाते. न्यूट्रिशनिस्टनुसार, महिलांनी 30 वर्षाच्या वयानंतर काही विशेष सप्लीमेंट आवश्य घेतले पाहिजेत. (Essential Supplements For Women)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

फोलिक अ‍ॅसिड (Folic acid) –
पेशींच्या विकासासाठी फोलिक अ‍ॅसिड खुप आवश्यक असते. जर तुम्ही 30 वर्षांच्या असाल आणि पुन्हा प्रेग्नंसीचे नियोजन करत असाल तर आपल्या डाएटमध्ये बी व्हिटॅमिन फोलेटची मात्रा वाढवा. याच्या सप्लीमेंट कोणत्याही दुकानात उपलब्ध असतात.

आयर्न (Iron) –
30 वर्षांच्या वयात एक आवश्यक मिनरल्स आयर्नसुद्धा आहे. महिलांमध्ये आयर्नच्या कमतरतेचा धोका जास्त असतो. याच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. याशिवाय आयर्नच्या कमतरतेमुळे इन्फेक्शनची शक्यता वाढते.

व्हिटॅमिन डी (Vitamin D) –
व्हिटॅमिन डी अतिरिक्त कॅल्शियम शोषित करण्यात मदत करते. हे हृदयरोगापासून वाचवते आणि वजन कमी करण्यात मदत करते. हे सप्लीमेंट घेण्याची आवश्यकता आहे.

मॅग्नेशियम (Magnesium) –
शरीरासाठी मॅग्नेशियम खुप आवश्यक आहे. कारण हे शरीरात प्रोटीन आणि हाडे बनवण्यात मदत करते. हे ब्लड शुगरसुद्धा स्थिर ठेवते. मॅग्नेशियमची कमतरता असलेल्या महिलांना मांसपेशीमध्ये वेदना, थकवा, मूड डिसऑर्डर, हाय ब्लड प्रेशर, हृदयाची धडधड अनियमित, मळमळ आणि मांसपेशींमध्ये कमजोरी जाणवते.

प्रोबायोटिक्स (Probiotics) –
प्रोबायोटिक्स गुड बॅक्टेरिया असतात जे आतड्यांसाठी चांगले असतात.
हे सप्लीमेंट डायरिया किंवा आयबीएस सारख्या पचनसंबंधी समस्या दूर करण्यास मदत करते.
प्रोबायोटिक्स अ‍ॅलर्जीपासून वाचवते. मात्र कोणत्याही प्रकारचे सप्लीमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.
ही न्यूट्रिशन आपल्या डाएटच्या माध्यमातून जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. (Essential Supplements For Women)

Web Title :- Essential Supplements For Women | five essential supplements for women nutritionist know about it

हे देखील वाचा :

Small Savings Schemes | केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात केला नाही बदल, इतकी होईल कमाई

Ashish Shelar | आमदार आशिष शेलारांकडून सूचक विधान, म्हणाले – ‘2 पक्षांकडून भाजपाला संकेत मिळाताहेत’

Dhananjay Munde | ‘अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या’; धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंवर टीकास्त्र

Related Posts