IMPIMP

लठ्ठ लोकांमध्ये लाँग कोविड इफेक्टचा धोका जास्त, जाणून घ्या

by omkar
Fat

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – मध्यम किंवा गंभीर लठ्ठपणाने (Fat) पीडित लोकांमध्ये कोविड-19 (Covid-19) ला हरवल्यानंतर दिर्घकालिन परिणामांची जास्त जोखीम असते, कोविड-19 (Covid – 19) रूग्णांच्या तुलनेत जे लठ्ठ नसतात. हा खुलासा अमेरिकेत करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये झाला आहे. हा रिसर्च अलिकडेच डायबिटीज, ओबेसिटी(Fat) आणि मेटाबोलिज्मच्या ऑनलाइन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला होता.

Pune Crime News : पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश

लठ्ठपणा कसा वाढवतो गुंतागुंत ?

यापूर्वी अनेक रिसर्चमध्ये लठ्ठपणाला कोविड-19 चा गंभर चेहरा असण्याचे जोखीमकारक म्हणून ओळखले गेले आहे आणि ज्यासाठी आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये भरती, इन्टेसिव्ह केयर आणि व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता असू शकते.लठ्ठपणाचा संबंध कार्डियो-व्हॅस्कुलर रोग, ब्लड क्लॉट्स, आणि लंग्जच्या स्थितीच्या वाढलेल्या जोखीमशी संबंधीत आहे. याशिवाय, लठ्ठपणा इम्यून सिस्टम कमजोर करणे आणि एक क्रोनिक सूजची स्थिती निर्माण करण्यासाठी ओळखला जातो.

संशोधकांचे म्हणणे आहे की, कोविड-19 आजाराचे कारण ठरणार्‍या कोरोना व्हायरसने संक्रमित झाल्यानंतर अशा स्थिती खराब परिणाम देऊ शकतात.
क्लेव्हीलँड क्लिनिकचे डायरेक्टर अली अमीनियन यांनी म्हटले,
आमच्या माहितीत हा रिसर्च पहिला आहे ज्यामधून समजले आहे की,
मध्यम ते गंभीर लठ्ठपणाने पीडितांना कोविड-19 चे दिर्घकालीन परिणाम होण्याचा धोका जास्त आहे.

मध्यम, गंभीर लठ्ठपणाच्या (Fat) रूग्णांमध्ये टेस्टची जास्त आवश्यकता

संशोधनकांनी रिसर्चच्या दरम्यान, क्लेव्हीलँड क्लिनिक हेल्थ सिस्टममध्ये मार्च 2020 पासून जुलै 2020 च्या दरम्यान येणार्‍या रूग्णांचा डेटा वापरण्यात आला, नंतर त्यांचा फॉलोअप जानेवारी 2021 पर्यंत जारी ठेवला.

त्यांनी कोविड-19 च्या संभाव्य दिर्घकालिन गुंतागुंतीच्या तीन संकेतांची चाचणी केली, ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल, मृत्युदर आणि मेडिकल टेस्टची आवश्यकता यांचा समावेश होता.
परिणामांची तुलना रूग्णांच्या पाच गु्रपमध्ये त्यांचा बॉडी इन्डेक्स म्हणजे 18.5-24.9 (सामान्य), 25-29.9 (अधिक वजन), 30-34.9 (हलका लठ्ठपणा), 35-39.9 (मध्यम लठ्ठपणा) आणि 40 किंवा त्यापेक्षा जास्त (गंभीर लठ्ठपणा) सोबत केली गेली.

एकुण 2,839 रूग्ण ज्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्याची आवश्यकता नव्हती आणि कोविड-19 च्या तीव्र टप्प्यापासून वाचले,
त्यांना रिसर्चच्या अंतिम परिणामात सहभागी करण्यात आले.
दुसरीकडे, सामान्य बॉडी मास इंडेक्स गटाला एका संदर्भाच्या रूपात समजले गेले.

परिणामावरून समजले की, कोविड-19 ला पराभूत केल्यानंतर विविध लक्षणे सामान्य असतात, परंतु मध्यम आणि गंभीर लठ्ठपणाच्या रूग्णांमध्ये दुसर्‍यांदा हॉस्पिटलमध्ये
जाण्याचा धोका अनुक्रमे 28 टक्के आणि 30 टक्के जास्त असतो.

अशाच प्रकारे विविध मेडिकल समस्यांचे मुल्यांकनासाठी टेस्टची

आवश्यकता सामान्य बॉडी मास इंडेक्सवाल्यांच्या तुलनेत मध्यम आणि गंभीर लठ्ठपणाच्या रूग्णांमध्ये अनुक्रमे 25 टक्के आणि 30 टक्केपेक्षा जस्त पडते.

जास्त विशेषकरून गॅस्ट्रोइंटेस्टायनल, हृदय, लंग, किडनी, व्हॅस्कुलर आणि मेंदूच्या आरोग्याचे मुल्यांकन करण्यासाठी चाचणी आवश्यकता 35 किंवा त्यापेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्सच्या रूग्णांमध्ये स्पष्टपणे जास्त होती.

संशोधकांचे म्हणणे आहे की, या रिसर्चचे मुल्यांकन संभाव्यपणे कोविड-19 च्या दिर्घकालीन गुंतागुंत दर्शवू शकते.

Also Read:- 

E-Pass l पुण्यातून ‘या’ 8 जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यकच – पुणे पोलीस

दुसर्‍यांदा पिता बनला प्रिन्स हॅरी, पत्नी मेगन मर्केलनं दिला गोंडस मुलीला जन्म, ‘लिली डायना’ ठेवलं नाव

जाणून घ्या 7 जूनचे राशीफळ; ‘या’ 4 राशींसाठी उघडतील प्रगतीचे नवे मार्ग

Video : छत्रपती संभाजीराजेंचा रायगडावरून इशारा, म्हणाले – ‘मी मेलो तरी चालेल पण, समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’

‘आतापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला, पण इथून पुढे…’, खा. संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; ‘या’ तारखेला निघणार पहिला मोर्चा (व्हिडीओ)

‘…उत्सुकतेपोटी माझ्या अंगावर तेव्हाही काटा आला होता, आज लिहितानाही येतो’ – जयंत पाटील

पुणे तिथं काय उणे ! 83 वर्षाचं म्हातारं अन् 70 व 65 वर्षांची म्हातारी चक्क करत होते गांजाची तस्करी; पोलिसांच्या छाप्यात 4 किलो गांजा जप्त

Related Posts