IMPIMP

Stress Reduce Foods : कोरोना काळात तणावावर औषधाने नव्हे, डाएटने करा उपचार

by sikandar141
health foods that can help manage mental stress during covid 19 pandemic

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stress Reduce Foods – कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेत ज्येष्ठांसह तरूणांना सुद्धा संसर्ग होत आहे. सतत महामारी चिंता आणि जवळच्या लोकांच्या आजारी पडण्याने आणि मृत्यूमुळे अनेकांना सतत तणावाखाली रहावे लागत आहे. त्यातच इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारची औषधे घेत आहेत, काहीजण तर याचा अतिरेकसुद्धा करत आहेत. अशा संकटाच्या काळात तणाव जाणवणे स्वाभाविक असले तरी त्याचा धैर्याने आणि विचारपूर्वक सामना केला पाहिजे. जर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर औषधे घेण्यापेक्षा डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तणावातून आराम मिळेल आणि इम्युनिटी सुद्धा वाढेल. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात…

1 तणाव दूर करेल केळे आणि भोपळ्याचे बी :

पोटॅशियम भरपूर असलेले फूड्स जसे की, भोपळ्याचे बी आणि केळे सेवन केले तर तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. यातील झिंकमुळे मुड चांगला राहतो.

2 हिरव्या पालेभाज्या खा :

तणाव दूर करण्यासाठी हिरव्या पालेभाज्या खा. पालक, पत्ता कोबी, बीटची पाने, सलाडमध्ये समावेश करा.

3 नट आणि सीड्स :

नट्स आणि सीड्स चिंता दूर करतात. यामध्ये डाएटरी फायबर, आवश्यक फॅटी अ‍ॅसिड, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सीडेंट्स भरपूर असते. यामुळे तणाव कमी होतो. बदाम, आक्रोड, मोहरी, भोपळ्याच्या बिया सेवन करा तणाव दूर करा.

4 प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि व्हिटॅमिन :

कोरोनाचा तणाव कमी करण्यासाठी डाएटमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन युक्त गोष्टींचे सेवन करा. बीन्स, मटर, मोहरी इत्यादीमध्ये हे भरपूर असते.

Also Read :

फायद्याची गोष्ट ! पोस्ट ऑफिस देतंय पैसे दुप्पट करण्याची सुवर्णसंधी, आजच करा 1000 रूपयांची गुंतवणूक अन् मिळवा लाखोंचा लाभ

Summer Food For Skin : उन्हाळ्यात डाएटमध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश अन् मिळवा यंग आणि हेल्दी त्वचा

पुण्यातील माजी नगरसेवक भीमराव खरात यांचे निधन

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED करणार बारमालकांची चौकशी, 5 जणांना समन्स

Related Posts