IMPIMP

High BP | उच्च रक्तदाबाची सर्वसामान्य दिसणारी ‘ही’ लक्षणे तुम्हाला माहीत आहेत?, जाणुन घ्या

by nagesh
High BP Symptoms | what are the symptoms of high blood pressure know the warning sign of high bp

सरकारसत्ता ऑनलाइन अनेकांना उच्च रक्तदाबाची (High BP) लक्षणे काय आहेत हे सामान्यतः लक्षात येत नाही. ज्यावेळी याची परिस्थीती उद्भभवते त्यावेळी आपणाला लक्षात येते. मात्र, काही बाबीद्वारे आपणाला आरोग्याची काळजी घेता येते. आगामी काळामध्ये तुम्हाला अशा गंभीर आजाराचा धोका आहे की नाही. हे काही बाबीवरुन लक्षात येऊ शकते. यूकेमध्ये, NHS च्या अंदाजानुसार 25 टक्के प्रौढांना उच्च रक्तदाबाचा धोका आहे. उच्च रक्तदाबासाठी (High BP) तुमचा आहार आणि तुमची आरामदायी जीवनशैली जबाबदार असू शकते.

उच्च रक्तदाबाला (high blood pressure) हायपरटेन्शन असं देखील म्हणतात. यात रक्तवाहिन्यांवर अधिक दबाव पडतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. डोकेदुखीही आजच्या जीवनात एक अतिशय सामान्य समस्या आहे. ती बदलते हवामान, तणाव आणि डिहायड्रेशनमुळे देखील होऊ शकते. परंतु, पुन्हा होणारी तीव्र डोकेदुखी उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते. पाणी पिऊन आणि विश्रांती घेतल्यानं डोकेदुखी दूर होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीपी उच्च अथवा कमी, दोन्हीमुळे डोकेदुखी होते. उच्च रक्तदाब जितका गंभीर असेल तितकाच डोकेदुखीचा त्रास जास्त होईल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उच्च रक्तदाबाचा (high blood pressure) धोकादायक पातळीमुळे हृदयविकाराचा (Heart disease) झटका येऊ शकतो. मळमळ रक्तदाब रोगात अचानक झालेल्या बदलामुळे मळमळ होऊ शकते. वास्तविक, रक्तदाबातील बदलांचा पचनसंस्थेवर देखील परिणाम होतो. काही लोकांना असं वाटते की त्यांचे पोट खराब झाले आहे. बीपीमध्ये चढ-उतारांमुळे ही समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे मळमळ अथवा उलट्या होऊ शकतात.

घाम येणे तणावामुळे रक्तदाब वाढतो. यामुळे पॅनीक अटॅक किंवा एंडाइटी (Panic attack or anxiety) देखील होऊ शकते.
उच्च रक्तदाबाच्या या प्रकारात खूप घाम येतो किंवा नसांमध्ये मुंग्या येतात.
शरीरातील एड्रेनालाईन केमिकलच्या (Adrenaline Chemical) पातळीत तीव्र चढ-उतार झाल्यामुळे हे लक्षण वर येऊ शकते.
धाप लागणे श्वास (Breathing) घेण्यात अडचण जाणवणे, हे देखील रक्तदाब वाढण्याचे लक्षण आहे.
हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीतील चढ-उतारांमुळे असू शकते.
शरीरात रक्त अभिसरण करण्यासाठी हृदय जबाबदार आहे.
या माध्यमातुन फुफ्फुसांपर्यंत पोहोचणारे रक्त देखील स्वच्छ होते.
जेव्हा बीपी वाढतो तेव्हा हे रक्ताभिसरण विस्कळीत होते. म्हणुन श्वास घेणे कठीण होते.

Web Title : High BP | you should know these common symptoms of live high blood pressure

हे देखील वाचा :

T20 World Cup 2021 | ‘टी’ 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निश्चित, जाणुन घ्या 15 सदस्यांची नावे

EPFO | पीएफ खातेधारक होणार ‘मालामाल’, अकाऊंटमध्ये लवकरच येईल मोठी रक्कम, जाणून घ्या सविस्तर

Relationship | पत्नीने पतीला दिली ‘छोटा पाहुणा’ येणार असल्याची खुशखबर, 2 वर्षापूर्वी नसबंदी केलेल्या पतीची उडाली झोप!

Related Posts