IMPIMP

Kadha In Summer : उन्हाळयात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? जाणून घ्या

by omkar

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – Kadha In Summer : कोरोना काळ सुरू झाल्यापासून अनेक लोक इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी विविध प्रकारचे काढे पित आहेत. काढा (Kadha) आरोग्यासाठी चांगला असला तरी त्याचे सेवन योग्यवेळी आणि योग्य प्रकारे केले पाहिजे.

दोनशे जणांची 7.14 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी ‘आदर्शनागरी’ च्या अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक

यामुळे इम्युनिटी वाढते तसेच सर्दी, खोकला, तापात तो उपयोगी ठरतो असे म्हटले जाते. परंतु उष्ण हवामानात काढा पिणे योग्य आहे का, याबाबत जाणून घेवूयात…

काय असते काढ्यात

काढ्यात (Kadha) गुळवेल, मुलेठी, लवंग, तुळस, दालचीनी, आले, काळीमिरी, हळद, इत्यादी घटक वापरून बनवतात.

उन्हाळ्यात काढा पिणे सुरक्षित आहे का ?

काढा (Kadha) एक आरोग्यदायी पेय असून याचे सेवन थंड आणि कोरड्या हवामानात करावे. जर उन्हाळा असेल तर जास्त मात्रेत काढा प्यायल्यास यामुळे अ‍ॅसिडिटी, उच्च रक्तदाब, बेचैनी, नाकातून रक्त येणे, छातीत जळजळ आणि मळमळ आदी समस्या होऊ शकतात. थर्मोजेनिक प्रकृतीच्या व्यक्तींना यामुळे समस्या होऊ शकतात. काढा गरम असतो.

सुरक्षित प्रकारे प्या काढा

– सायंकाळी झोप घेऊन उठल्यानंतर एक तासानंतर 4 ते 5 वाजताच्या दरम्यान काढा प्या.
– काढा रिकाम्या पोटी पिऊ नका, कारण यातील तत्व अ‍ॅसिडिटी निर्माण करतात. नाश्त्यानंतर याचे सेवन करू शकता.
– एकावेळी 150 एमएलपेक्षा जास्त काढा पिऊ नका. अन्यथा मळमळ, अ‍ॅसिडिटी होऊ शकते.
– काळिमिरी आणि आले गरम असल्याने प्रमाणात वापरा.
– काढ्यात मध आवश्य मिसळा, यामुळे अ‍ॅसिडिटी, छातीत वेदना या समस्या होणार नाहीत.
– डायबिटीज असेल तर मध किंवा मुलेठीचा वापर टाळा.

Also Read:- 

पुण्यातील देहुरोडमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन सामुहिक बलात्कार

जाणून घ्या 3 जूनचे राशिफळ

अ‍ॅलोपॅथीनंतरआता बाबा रामदेव यांचा ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…

‘राजकारणात काहीही घडू शकतं’ ! राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचार्‍याचे तडकाफडकी निलंबन

‘राज-उद्धव’ Shivsena एकत्र येतील काय? राज यांचे मार्मिक उत्तर, म्हणाले….

मोदी सरकारची 6 कोटी नोकरदारांना मोठं गिफ्ट ! पुढील महिन्यात PF खात्यात येतील जास्त पैसे, जाणून घ्या

Coronavirus : ‘या’ स्थितीत असतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या

Related Posts