IMPIMP

Kolhapur Crime | दुर्दैवी ! लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच 28 वर्षीय युवकाचा हृदयद्रावक मृत्यू

by nagesh
Pune Crime | Chain Snatching In Vishrantwadi Chowk Yerwada Pune

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – Kolhapur Crime | लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच एका 28 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यु (Died) झाला आहे. मित्रासह आत्याला भेटायला जात असताना रस्त्यात अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये युवकाचा मृत्यू (Died) झाला. ही घटना कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात घडली. दीड महिन्यापूर्वी विवाह झाला होता तोवर संसारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर पत्नीसह कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला आहे. श्रीधर रामचंद्र मंडलिक (Sridhar Ramchandra Mandlik) असं मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, श्रीधर हा आजरा तालुक्यातील अर्जुनवाडी (Accident in Kolhapur) येथील रहिवासी होता. घटनेच्या दिवशी तो आपला मित्र आकाश सुतार (Akash Sutar) याला घेऊन इंचनाळ येथे आपल्या आत्याला भेटायला गेला होता. दरम्यान दुपारी चारच्या सुमारास हारूरवरून गजरगाव बंधाऱ्याकडे जाताना श्रीधरचं गाडीवरील नियंत्रण सुटले. यातच श्रीधर बंधाऱ्यावरून उडून खाली दगडावर जाऊन आदळला. यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेला मित्र आकाश याने त्वरित गाडीवरून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. (Kolhapur Crime)

दरम्यान, या घटनेबाबत माहिती समजताच आजरा पोलिस (Ajara Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्रीधर बंधाऱ्यावरून थेट खाली दगडावर कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रसंगावधान दाखवून आकाशने धावत्या गाडीवरुन उडी मारल्याने त्याचा प्राण वाचला. श्रीधरचा दुर्दैवी मृत्यु झाल्याने कुंटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सायंकाळी उशिरा आजरा पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title :- Kolhapur Crime | 28 years old young man died in road accident in ajara kolhapur

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Towel And Bacteria | आंघोळीनंतर ताबडतोब शरीरावर गुंडाळत असाल टॉवेल तर व्हा सावध, तुमच्या शरीरावर वाढू शकतात धोकादायक बॅक्टेरिया

Post Office Saving Scheme | पोस्ट ऑफिसची ग्रामीणवासीयांसाठी जबरदस्त स्कीम ! केवळ 95 रुपये गुंतवा अन् मिळवा 14 लाख, जाणून घ्या

Corporator Vasant More | ‘छत्तीसगड’च्या भाजप पदाधिकाऱ्याची वैयक्तिक कामासाठी पुण्यात ‘मनसे’ला साद ! दिवसांत सोडवला ‘लाखों’चा प्रश्न

Related Posts