IMPIMP

जळगाव : राम मंदिरासाठी अवैधरित्या ‘वर्गणी’ची वसूली, FIR  दाखल

by sikandershaikh
Ram mandir

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)अयोध्या येथील राम मंदिर (ram mandir) उभारणीसाठी चक्क बनावट पावती पुस्तक छापून देणगी वसूल करणाऱ्या एका भामट्याला बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. गुरुवारी (दि.18) दुपारी गोलाणी मार्केट परिसरातून त्याला पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडून बनावट पावती पुस्तक हस्तगत  केले आहे.

राजेंद्र भास्करराव सोनवणे (47 रा.चाळीसगाव घाट) असे गुन्हा दाखल केलेल्या भामट्याचे नाव आहे.  राकेश कांतीलाल लोहार  यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनवणे याने साईचैतन्य बहुउद्देशीय संस्था व विश्व हिंदू परिषद द्वारा संचलित जळगाव या नावाने पावती पुस्तक तयार करून त्यावर 14 फेब्रुवारी ते 14 एप्रिल 2021 विधी समर्पण अभियान असे छापले आहे. पावती पुस्तकात  400, 50, 10 रुपयांच्या पावत्या फाडण्यात आलेल्या आढळून आल्या.

गोलाणी मार्केटमध्ये गुरुवारी दुपारी तीन वाजता सोनवणे पावत्या फाडत असल्याचे काही संघटनांच्या प्रतिनिधींच्या लक्षात आले.
बजरंग दलाचे जिल्हा संयोजक राकेश कांतीलाल लोहार, राजेंद्र देविदास नन्नवरे व देवेंद्र दुर्गादास भावसार
व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन  सोनवणे याची चौकशी केली. त्यावेळी  सर्वच प्रकार संशयास्पद वाटला.
राम मंदिर (ram mandir) बांधकामाच्या नावाने तो लोकांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच
त्याला ताब्यात घेऊन थेट पोलीस ठाण्यात आणून पोलीसांच्या स्वाधीन केले.

अमरावती : दुर्दैवी ! पाळण्याच्या दोरीचा फास लागून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू

Nagpur News : पत्नी खाते तंबाखू ! त्रस्त पती घटस्फोटासाठी पोहचला न्यायालयात, हायकोर्टाने दिला मोठा निर्णय

Related Posts