IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | 1 हजाराची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

by Team Deccan Express
Pune ACB Trap | Two arrested along with a legal consultant who took bribe of 40 thousand for giving favorable report

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | एक हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक (Headmaster) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon) जाळ्यात सापडला आहे. इयत्ता 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर निकालाचे गुणपत्रक आणि बोर्ड सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याच्या आईचे नाव चुकीचे आले होते. या दोन्ही प्रमाणपत्रांवरील नावाची दुरुस्ती करून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापकाने 1 हजारांची लाचेची मागणी केली. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. राजेंद्र भास्करराव पाटील (Rajendra Bhaskarrao Patil), (55, रा. भगवती हौसिंग सोसायटी, चाळीसगाव) असं लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात (Chalisgaon City Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.

तरवाडे (ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) येथील फिर्यादींचा मुलगा कविवर्य श्री ना. धों. महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव (N. D. Mahanor Secondary And Higher Secondary School, Wadgaon) येथे सन 2021 मध्ये 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. या निकालाचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टिफिकेटवर विद्यार्थ्याच्या आईचे नाव चुकीचे छापून आले होते. या दोन्ही प्रमाणपत्रांवरील नाव दुरुस्ती करून देण्याच्या मोबदल्यात फिर्यादीकडे मुख्याध्यापक पाटील यांनी 1 हजारांची लाच मागितली होती.

त्यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) Jalgaon) सापळा रचला. मुख्याध्यापक पाटील यांस त्यांच्या राहते घरी लाच स्वीकारताना अटक (Arrested) करण्यात आली आहे. सदरची कारवाई एसीबी पथकाचे उपअधीक्षक शशिकांत पाटील (DYSP Shashikant Patil), पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव (Police Inspector Sanjog Bachhav) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Jalgaon | Headmaster caught accepting bribe of Rs one thousand in jalgaon

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts