IMPIMP

Jalgaon Crime | ओढणीने गळफास घेऊन 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या

by nagesh
Pune Pimpri Crime | man suicides after not getting job in pimpri chinchwad of pune

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइनJalgaon Crime | जळगाव येथील के सी पार्क (KC Park, Jalgaon) परिसरातील भारत नगरमध्ये ओढणीने गळफास घेऊन एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची (Suicide in Jalgaon) घटना उघडकीस आली आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजता ही घटना घडली असून कोमल ज्ञानेश्वर कांबळे (Komal Dnyaneshwar Kamble) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. दरम्यान, या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद (Jalgaon Crime) केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी घरी कोणी नसताना कोमलने आत्महत्या केली. शेजारी राहणाऱ्या 12 वर्षाच्या मुलीच्या लक्षात ही घटना येताच तिने मोठ्या व्यक्तींना हा प्रकार सांगितला. त्यानंतर नातेवाईक आणि शेजारी राहणाऱ्यांनी कोमलला शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे (Medical Officer Dr. Renuka Bhangale) यांनी तिला मृत घोषित केले. (Jalgaon Crime)

कोमलचे वडील चालक आहेत तर आई मजुरी करते. तसेच तिला दोन भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे. तिने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :- Jalgaon Crime | a 20 year old girl ended her life by hanging

हे देखील वाचा :

Amravati Crime | ‘कोरोना’ चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याप्रकरणी लॅब टेक्निशियनला 10 वर्षे कारावास

Pune Fire News | पुण्याच्या येवलेवाडीतील फर्निचरच्या गोडावूनला भीषण आग; सर्व लाकडे, साहित्य जळून खाक (व्हिडीओ)

Ramakant Torne Passes Away | ज्येष्ठ पत्रकार रमाकांत तोरणे यांचे निधन

Related Posts