IMPIMP

Murder In Jalgaon | चॉपरने सपासप वार करुन मुलानं बापालं संपवलं

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन जळगाव जिल्ह्यातील निमखेडी येथे मुलाने बापाचा खून (Murder In Jalgaon) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन मुलांनी आपल्या जन्मदात्या वडिलांचा निर्घृण खून (Son killed father) केला आहे. वडिलांनी आईवर भलताच संशय घेतल्यानं मुलानं पित्याची छातीत चॉपर (Chopper) खूपसून खून (Murder In Jalgaon) केला आहे. संबंधित घटना रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास निमखेडी येथील कांताई नेत्रालय जवळ घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात (taluka police station) गुन्हा दाखल करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे.

प्रेमसिंग अभयसिंग राठोड असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो मुळचा मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बऱ्हाणपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. रविवारी सकाळी प्रेमसिंग याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubt over character) घेतला होता. त्यामुळे राठोड आणि त्यांची दोन मुलं यांच्यात वादाला सुरुवात झाली. यातून हा वाद वाढत गेला आणि वादाचे रुपांतर खुनाच्या घटनेत झालं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

नेमकं काय घडलं ?

प्रेमसिंग राठोड याला कानाचा त्रास होता. त्यामुळे रविवारी त्यांना शहरातील दवाखान्यात जाऊन बऱ्हाणपूर येथे जाण्याबाबत मुलगा गोपाल आणि दीपक या दोघांनी आग्रही केला होता. पण प्रेमसिंग तिकडे जाण्यास तयार नव्हते. तिकडे जाण्याला विरोध करत प्रेमसिंग यांनी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. मी तिकडे गेलो तर पत्नी पाठीमागे दुसऱ्या लोकांच्या संपर्कात येते, असे बोलून त्यानं मुलांसमोर पत्नीचा अपमान केला.

वडिलांनी आईच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने दोन्ही मुले संतापली.
तिघांमध्ये यावर वादाला सुरुवात झाली.
हा वाद एवढा की दीपकनं रागाच्या भरात बापाला लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केली.
मुलानं मारहाण केल्यानं प्रेमसिंग याने घरात लपवून ठेवलेला चॉपर मुलांवर हल्ला करण्यासाठी आणला.
मृत प्रेमसिंग हा मुलांवर हल्ला करणार इतक्यात गोपाल याने वडिलांच्या हातातून चॉपर हिसकावून घेतला.
गोपालने प्रेमसिंगच्या छातीवर, डोक्यावर आणि कमरेजवळ सपासप वार केले.
हा हल्ला एवढा भयंकर होता की प्रेमसिंग याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title :-  Murder in Jalgaon | son killed father with chopper in jalgaon after father suspicion on mothers character

हे देखील वाचा :

Sanjay Rathod | मंत्रीपदाचा राजीनामा का दिला?; संजय राठोड यांनी दिलं स्पष्टीकरण

Thane Anti Corruption | 4 लाखाची लाच घेऊन पुन्हा 1 लाखाची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ZP Election | ओबीसी आरक्षणाशिवाय होणार ZP पोटनिवडणुका; राजकीय वातावरण तापणार

Related Posts