IMPIMP

कोल्हापूर : वडगावचे माजी नगरसेवक आर. डी. पाटील यांचे निधन

by amol
r.d.-patil

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)वडगावचे माजी नगरसेवक आणि कोल्हापूर येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन रंगराव दत्तू उर्फ आर. डी. पाटील (R D Patil) (वडगावकर) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण आज त्यांचे निधन झाले. पेठ वडगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आर. डी. पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पाटील (R D Patil) यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार राजू आवळे, जयंत आसगावकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. अशोक माने, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पाटील यांनी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन, माजी नगरसेवकपद आणि जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपदही भूषवले.

दरम्यान, आर. डी. पाटील हे मूळचे भादोले गावचे होते. त्यांनी पेठ वडगाव येथील बळवंतराव यादव हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये 30 वर्षे प्राचार्य म्हणून काम पाहिले होते.
तसेच त्यांनी 1997 ते 2003 पर्यंत मुख्याध्यापक संघाचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते.

वडगावचे नगरसेवक

1991, 1996 (स्वीकृत) तर 2006 मध्ये त्यांनी नगरसेवकपदही भूषविले होते.
तर राज्य मुख्याध्यापक संघाचे ते संचालकही राहिले होते.

जळगाव : राम मंदिरासाठी अवैधरित्या ‘वर्गणी’ची वसूली, FIR  दाखल  

धक्कादायक ! पत्नीचा निर्घृण खून करून पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या

Bhandara fire case : भंडारा दुर्घटनेप्रकरणी 40 दिवसानंतर 2 नर्सवर FIR दाखल

Related Posts