IMPIMP

अभिमानास्पद ! वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकाच कुटुंबातील 6 बहिणी पोलीस दलात

six-sister-join-police-department-waghave-bhosale-family-success in kolhapur

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन – भारतीय संस्कृतीमध्ये वंश चालवण्यासाठी आजही मुलाचा हट्ट धरला जातो. अशा मानसिकतेची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत आणि पाहात आहोत. मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातो. मात्र, या वृत्तीला छेत देत मुलीही वंशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. याचं उत्तम उदाहरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे या छोट्याशा गावातील भोसले कुटुंब. या कुटुंबातील सहा मुली पोलीस Police दलात भरती झाल्या आहेत. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकाच कुटुंबातील सहा बहिणी पोलीस Police दलात भरती झाल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाघवे या लहान गावातील एका शेतकरी कुटुंबातील सहा बहिणी सध्या महाराष्ट्र पोलीस Police दलात कर्तव्य बजावत आहेत. या गावातील मुलींना कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना घेतलेली ही उत्तुंग झेप आजच्या तरुणींना प्रेरणादायी ठरली आहे. एवढेच नाही तर त्यांचे दोन भाऊ देशसेवेच्या रक्षणासाठी सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करीत आहेत. सुजाता भोसले, विमल भोसले, रूपाली भोसले, सोनाली भोसले, सुवर्णा भोसले, सारिका भोसले अशी या बहिणींची नावे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाघवे या लहान गावातील खोतवाडीमध्ये हे भोसले कुटुंब वास्तव्यास आहे. सुरेश रंगराव भोसले, चंद्रकांत रंगराव भोसले आणि प्रकाश रंगराव भोसले हे तिघे भाऊ. प्रकाश भोसले कोल्हापुरात स्थायिक झाले तर त्यांचे इतर दोन भाऊ सुरेश आणि चंद्रकांत हे गावात शेती करतात. सुरेश यांना चार मुली आणि दोन मुलं, तर चंद्रकांत यांना तीन मुली. सुरेश भोसले हे पोलीस भरतीसाठी गेले होते. मात्र, त्यांना पोलीस Police दलात भरती होता आले नाही. त्यामुळे आपल्या वडिलांचे पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या तीन मुलींनी पोलीस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला.

गावापासून शाळा दोन किलोमीटर अंतरावर होती. शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेताच्या बांधावरून शाळेत जायचे. काहीही करून पोलीस दलात भरती होण्याचा निश्चय त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी कोणताही क्लास लावला नाही. तसेच कोणाचे मार्गदर्शनदेखील मिळाले नाही. फक्त पोलीस Police दलात भरती होण्याचा हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी अभ्यास केला. 2008 मध्ये सुवर्णा आणि सोनाली भोसले या दोन बहिणी एकाचवेळी पोलीस Police दलात भरती झाल्या. त्यामुळे त्यांच्या अन्य चार बहिणींना त्यांची प्रेरणा मिळाली आणि त्यांनीही पोलीस दलात भरती होण्याचा निर्णय घेतला.

पोलीस Police दलात भरती झालेल्या बहिणींकडून मार्गदर्शन त्यांना मिळत होते. त्यांच्याप्रमाणे आपणही पोलीस दलात जाण्याची जिद्द त्यांनी उराशी बाळगली. आपल्या मुलींनी उंच भरारी घ्यावी, अशी आशा शेतकरी कुटुंबातील आई-वडिलांची होती. आई-वडिलांच्या आशीर्वादाने अन्य चार बहिणींनीदेखील पोलीस खात्यात भरती होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले. एकाच कुटुंबातील सहा बहिणी पोलीस दलात भरती होण्याची कदाचित राज्यातील पहिलीच वेळ असावी.

पोलीस Police दलात भरती झालेल्या सहापैकी पाच जणींचे लग्न झाले आहे. मात्र, त्यांनी आपले आडनाव भोसले हे कायम ठेवले आहे. सारिका भोसले या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात तर सुवर्णा भोसले कोल्हापूरातल्या पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्य बजावत आहेत. सुजाता भोसले अलिबाग-रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात, रूपाली भोसले नाशिक शहर पोलीस, सोनाली भोसले राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर या ठिकाणी आहेत, तर विमल भोसले या कोल्हापूर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. एकाच कुटुंबातील सहा मुलींनी मिळवलेले हे यश पंचक्रोशीत अभिमानास्पद ठरले आहे.

Alos Read :

Pune : बांधकामात गुंतवणूक करण्याच्या अमिषाने 74 लाखाला गंडा, एकावर FIR दाखल

लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत हे विरोधी पक्षाला कधी कळणार?

फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी नागपूरला जाऊन घेतली सरसंघचालकांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा