IMPIMP

3rd Wave Of Corona | ‘कोल्हापूर जिल्ह्यात 15 ऑक्टोबर पासून तिसरी लाट तीव्र होण्याची भीती?’, ‘या’ मंत्र्याने केले मोठे वक्तव्य

by nagesh
3rd Wave Of Corona | Fear of intensification of third wave in Kolhapur district from October 15?

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन   – राज्यात आता कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा (3rd Wave Of Corona) धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सरकारने देखील तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त करत या लाटेशी दोन हात करता यावेत यासाठी तयारी सुरु केली आहे. तिसरी लाट केव्हा येण्याची शक्यता आहे, याबाबत तज्ञ विविध मते व्यक्त करीत आहेत. कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत (3rd Wave Of Corona) महत्वाचे वक्तव्य केले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

कोल्हापूर जिल्ह्यात तिसरी लाट 15 ऑक्टोबर पासून तीव्र होण्याची भीती आहे. असे वक्तव्य सतेज पाटील यांनी केले आहे. आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) झालेल्या आढावा बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक ती यंत्रणा सज्ज करण्यात येत असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात तिसरी लाट एक दिवसातील रुग्ण संख्या 29 हजारापर्यंत जाऊ शकते अशी शक्यताही यावेळी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी विनाकारण गर्दी करु नये घराबाहेर पडू नये.
लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार घ्यावेत. त्यामध्ये दिरंगाई करु नये, असे आवाहन ही पाटील यांनी केले.
प्रत्येक तालुक्यात ऑक्सीजन बेड (Oxygen bed) उपलब्ध होतील. यानुसार नियोजन केले जात आहे.
त्यासह सीपीआर (CPR), आयजीएम (IGM), इचलकरंजी व गडहिंग्लज येथे 120 बेडचे पीडियाट्रिक युनिट
तसेच अतिरिक्त 90 बेड्सचे पीडियाट्रिक आयसीयू युनिट सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title : 3rd Wave Of Corona | Fear of intensification of third wave in Kolhapur district from October 15?

हे देखील वाचा :

Mutual Funds | ते चार म्यूच्युअल फंड्स जे कमाईसह टॅक्स सेव्हिंगमध्ये सुद्धा करतात मदत, जाणून घ्या

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 3 दिवस पाऊस बरसणार; मुंबईसह पुण्यात मुसळधार

Anil Parab | आता शिवसेना नेते अनिल परबांच्या मागे ED चा ससेमिरा; 3 मालमत्तांवर छापेमारी

Related Posts