Chandrahar Patil | सांगलीत ठाकरे गटाला धक्का? चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदेंच्या दिल्लीतील गुप्त बैठकीचा फोटो व्हायरल

कोल्हापूर : Chandrahar Patil | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील हे शिंदे गटात जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे सांगलीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही भेट घडून आली होती. या बैठकीनंतर चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच पंगतीत जेवल्याचीही माहिती समोर आली होती. तेव्हापासूनच चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, चंद्रहार पाटील यांनी या सर्व शक्यता फेटाळल्या होत्या. परंतु, आता चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या भेटीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वीच दिल्लीत चंद्रहार पाटील आणि श्रीकांत शिंदे यांची बैठक झाली होती. या बैठकीला खासदार धैर्यशील माने हेदेखील उपस्थित होते. या तिघांमध्ये दिल्लीत चर्चा झाली. त्यामुळे आता चंद्रहार पाटील हे येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
Comments are closed.