Kolhapur Accident News | डोक्यावर 70 हजारांचे हेल्मेट असतानाही कोल्हापुरातील तरुणाचा अपघाती मृत्यू; परिसरात हळहळ

Kolhapur Accident News | Accidental death of a young man in Kolhapur despite wearing a helmet worth Rs 70,000; There is a stir in the area

कोल्हापूर : Kolhapur Accident News | आजरा आंबोली महामार्गावर देवर्डे मादाळ तिट्टा दरम्यान झालेल्या भीषण अपघातात कोल्हापुरातील उद्योजकाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तब्बल १२ लाखांची स्पोर्ट्स बाईक आणि डोक्यावर ७० हजाराचे अत्याधुनिक हेल्मेट असतानाही जीव गमवावा लागला.

सिद्धेश विलास रेडेकर (वय २३, रा. माळी कॉलनी, टाकळा, कोल्हापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तो कोल्हापूरमध्ये आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होता. सिद्धेश बायकर्स होता. बांधकाम व्यावसायिक विलास रेडेकर यांचा तो मुलगा असून, त्यांचा कोल्हापूरमध्ये मोठा जनसंपर्क असल्याने मुलाच्या अपघाताचे वृत्त समजताच सीपीआरमध्ये मोठी गर्दी झाली होती. सिद्धार्थ हा एकुलता एक होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धेश बायकर्स असल्याने नेहमीच फेरफटका करण्याची सवय होती. त्याला फोटोग्राफीचीही आवड होती. नेहमीप्रमाणे सिद्धेश हा चार मित्रांसमवेत रविवारी सकाळी आंबोलीकडे बाईक राईडसाठी गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत चार मित्र देखील होते. कोल्हापुरातून सकाळी ६ वाजता ते निघाले होते. आंबोली घाटातील विविध ठिकाणी त्यांनी भेटी देत आणि फोटोसेशनही केले होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता ते कोल्हापूरच्या दिशेने येत असतानाच धोकादायक वळणावर कोल्हापूर येथून सावंतवाडीकडे येणाऱ्या तवेरा गाडीला सिद्धेशच्या बाईकची समोरून जोराची धडक बसली.

त्याच्या डोक्याचे हेल्मेट रस्त्याच्या कडेला तुटून पडले, इतकी ही भीषण धडक होती. या धडकेत त्याच्या हाताला छातीला, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने गडहिंग्लजमध्ये खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.