Kolhapur Crime News | धक्कादायक! चार पानी चिठ्ठी लिहून कोल्हापुरात एमबीए तरुणाची आत्महत्या

Kolhapur Crime News | Shocking! MBA student commits suicide in Kolhapur by writing a four-page note

कोल्हापूर   – Kolhapur Crime News | मित्राकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून कोल्हापुरातील आर. के नगर येथे राहणाऱ्या तरुणाने राहत्या घरी फॅनला दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. आकाश शांताराम बोराडे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  

पोलिसांना मृत तरुणाच्या खोलीतून चार पानी चिठ्ठी देखील सापडली असून, करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आकाश बोराडे हा आपल्या आई-वडिलांसह आर.के नगर सोसायटीत गेल्या तीन वर्षांपासून भाड्याने राहत होता. तो कोल्हापुरातील के.आय.टी कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत होता. त्याने नुकतीच अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. त्याचे कॅम्पस इंटरव्यूमधून एका मॉलमध्ये व्यवस्थापक म्हणून सिलेक्शनही झाले होते.

गेल्या काही दिवसात तो तणावाखाली होता. त्याच्या नातेवाईकांनी त्याला कारण विचारल्यानंतर त्याने मित्राच्या त्रासाला कंटाळलो असल्याचे सांगितले होते. दिवसेंदिवस मित्राचा त्रास अधिक होत असल्याने आकाश याने गुरुवारी रात्री राहत्या घरात बेडरूममध्ये पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. मित्र त्याला नेमका कशाचा त्रास देत होता, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.