IMPIMP

Kolhapur News : विहिरीत बुडून तरूणाचा मृत्यू

by sikandershaikh
Kolhapur

कोल्हापूर (Kolhapur) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Kolhapur | चार महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या एका तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. निगवे दुमाला ( ता. करवीर ) येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रतिम प्रकाश पाखरे (वय 24, रा. निगवे दुमाला)  असे  विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. 1 ) सकाळी 9 वाजता प्रतिम घरातून कामावर जातो असे सांगून निघून गेला होता. तो रात्री घरी परत आलाच नाही. त्यामुळे 2  मार्च रोजी करवीर पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी मुलगा हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान शेजारी सहदेव चौगले व दिपक पाटील यांची सोनतळीलगत असलेल्या विहीरीत मुलाचे प्रेत तरंगत असलेले त्यांना दिसले.

त्यांनी प्रेत विहिरीतून बाहेर काढले. करवीर पोलिसानी पंचनामा करून  मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. प्रतिमचे चार महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.  करवीर पोलिस तपास करत आहेत.

Related Posts