IMPIMP

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाल्यास 15 दिवसांची रजा मिळणार

by omkar
Union Ministry of Staff

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाच्या विषाणूने देशात घर केलं आहे.
वाढत्या कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाने (Union Ministry of Staff) एक मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारी कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला (government employee) अर्थात त्याच्या परिवारातील जबाबदार सदस्याला जर कोरोनाची बाधा झाली तर,
त्या कर्मचाऱ्यास (government employee) पंधरा दिवसाची रजा देण्यात येणार आहे.
असा आदेश केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाकडून जारी करण्यात आला आहे.
जर 15 दिवसाच्या रजेची मुदत संपली आणि त्याच्या परिवारातील सदस्य हॉस्पिटलमध्ये असेल तर,
रुग्ण अर्थात तो सदस्य ठीक होईपर्यंत मुदत वाढवली जाणार आहे.
यासंदर्भात केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाने (Union Ministry of Staff) आदेशात नमूद केले आहे.

 Congress Leader Sachin Pilot : भाजपवासी झालेल्या ‘या’ महिला नेत्याचा मोठा दावा, म्हणाल्या – ‘सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील’

कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे लोकांची अवस्था बिकट होत आहे.
त्यातच सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आल्यास त्या कर्मचाऱ्याला नोकरीतून आपल्या सदस्याकडे वेळ देता येत नाही.
म्हणून केंद्रीय मंत्रालयाने याबाबत आदेश काढला आहे.
तसेच, जर सरकारी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यास त्या कर्मचाऱ्याला वीस दिवसाची रजा देण्यात येणार आहे.
तसेच, त्या कर्मचाऱ्याचा कोरोना टेस्ट अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे लेखी कागदोपत्री पुरावे सादर केल्यास कर्मचाऱ्याला वीस दिवसाची रजा मंजूर केली जाणार आहे.
असे केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाच्या (Union Ministry of Staff) आदेशात नमूद करण्यात आले आहे.

फायद्याची गोष्ट ! पीपीएफ अकाऊंटमध्ये 10 वर्षाच्या मुलांच्या नावाने दरमहा 500 रूपये जमा करून 28 लाख मिळवण्याची संधी, जाणून घ्या

केंद्रीय कर्मचारी मंत्रालयाच्या आदेशातील नियम –
> सहकारी कुटुंबातील सदस्य अथवा पालक (कर्मचाऱ्याच्या सोबत राहणारे) कोरोना टेस्ट अहवाल सकारात्मक (Positive) असल्यास सरकारी कर्मचार्‍यास 15 दिवसांची खास कॅज्युअल रजा (Casual leave) देण्यात येणार आहे.

> जर सरकारी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी थेट संपर्कात आला आणि जर घरात विलगीकरणात असेल तर ‘त्याला 7 दिवसांच्या कालावधीत घरातून काम करण्याचे स्वातंत्र्य दिले जाणार आहे.

> सरकारी कर्मचाऱ्याने विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला असेल तरिही जर तो कंटेन्टमेंट झोनमध्ये राहत असेल तर त्याला तो परिसर अथवा ठिकाण नॉन कंटेन्टमेंट झोन होईपर्यंत घरातून काम करण्याचे स्वातंत्र्य असणार आहे.

CoWin Vaccination Update : व्हॅक्सीन सर्टिफिकेटमध्ये काही चूक असेल तर घरबसल्या करा सुधारणा, ‘ही’ आहे पद्धत

Web Title- 15 days special casual leave for govt employees whose parents or dependents test Covid positive: Centre

Related Posts