IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ! 2022 मध्ये वेतनात होणार भरघोस वाढ?, जाणून घ्या

by bali123
7th Pay Commission | 7th pay commission there will be a big increase in the minimum salary of central employees rs 35510 detail here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांना (central government employees) केंद्र सरकारकडून (Central Government) एक आनंदाची बातमी आहे. आगामी काळामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. 2021 च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी सरकारी विभागात पदोन्नती होणार आहे. तसेच 2022 मधील केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central staff) फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील वाढ करुन दिली जाऊ शकणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना किमान वेतनात देखील वाढ होणार आहे.

जानेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता (DA) 3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. अर्थात महागाई भत्ता 31 टक्क्यांवरुन 34 टक्के होणार आहे. एआयसीपीआयच्या (AICPI) च्या आकडेवारीवरुन सध्या सप्टेंबर 2021 पर्यंतचे आकडे उपलब्ध आहेत. त्यानुसार महागाई भत्ता (DA) 32.81 टक्के आहे. तसेच, जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार जुलै 2021 मध्ये महागाई भत्ता (DA) देखील 31 टक्क्यांनी वाढला आहे.
अर्थात महागाई भत्त्याची गणना केली जाईल आणि यामध्ये भरघोस वाढ होण्याची अपेक्षा आहे.
असं यामधील पुढील आकडेवारीनुसार समजतं. (7th Pay Commission)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

दरम्यान. सप्टेंबर 2021 पर्यंत महागाई भत्ता (DA) 33 टक्के आहे.
म्हणजे यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे आकडे अद्याप पुढे आलेले नसल्याने याच्या एक टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
असं AICPI आकडेवारीनुसार कळते.
दरम्यान, डिसेंबर 2021 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत 125 वर असल्यास महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
तर, एकण 3 टक्के वाढून 34 टक्के होईल. याचे वेतन जानेवारी 2022 मध्ये केले जाईल.

दरम्यान, या पार्श्वभुमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central staff) वेतनात देखील वाढ होणार आहे.
मोदी सरकार (Modi Government) जानेवारी 2022 च्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या
हाउस रेंट अलाउंस (House Rent Allowance) मध्ये देखील वाढ करु शकते. असं एका अहवालानूसार समोर येत आहे.

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central government might be get good news in december 2022 salary may hike

Related Posts