IMPIMP

7th Pay Commission | कर्मचार्‍यांच्या बँक खात्यात येतील 1.50 लाख रूपये, मिळणार 18 महिन्यांचा DA Arrears, डीएसंबंधी आली मोठी माहिती

by Team Deccan Express
7th Pay Commission | 7th pay commission da arear big update 18 months da arear of rupees more than one lakh come soon in salary bank account pm narendra modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी 18 महिन्यांच्या DA एरियरची मोठ्या कालावधीपासून प्रतीक्षा करत आहेत (DA Arrears News). कर्मचारी सातत्याने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत रोखलेल्या डीएची मागणी करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सरकार एकरकमी 1.50 लाख रूपये सरकारी कर्मचार्‍यांना देण्याची योजना आखत आहे. जर असे झाले तर सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात एकाचवेळी भरपूर पैसे येतील. (7th Pay Commission)

DA एरियरवर सरकार करत आहे विचार

सरकारी कर्मचार्‍यांना अपेक्षा आहे की डीए एरियर देण्याबाबत सरकार विचार करेल आणि यावर तोडगा लवकर निघेल. नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव, स्टाफ साईड, शिव गोपाळ मिश्रा यांच्यानुसार, कौन्सिलने सरकारकडे मागणी केली आहे, परंतु अजूनपर्यंत कोणताही मार्ग निघालेला नाही. (7th Pay Commission)

इतका मिळेल DA एरियर

लेव्हल 1 च्या कर्मचार्‍यांचा डीए एरियर 11880 रूपये ते 37000 हजार रूपयांच्या दरम्यान असेल.
तर, लेव्हल 13 च्या कर्मचार्‍यांना 144200 रूपये ते 218200 रूपये डीए एरियर मिळेल.
सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शन धारकांना डीए दिला जातो.
हा कर्मचार्‍यांना त्यांच्या राहनीमानाच्या खर्चात मदत करण्यासाठी दिला जातो.

एकाच वेळी येतील पगारात पैसे

अर्थ मंत्रालय, डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग आणि खर्च विभागाच्या अधिकार्‍यांसोबत संयुक्त सल्लागार तंज्ञ, यांची बैठक होईल.
यामध्ये डीए एरियरच्या एकरकमी पेमेंटवर चर्चा होईल. असे वृत्त आहे की, सरकार कर्मचार्‍यांना डीए एरियर म्हणून 1.50 लाख रूपये एकाचवेळी देऊ शकते.

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da arear big update 18 months da arear of rupees more than one lakh come soon in salary bank account pm narendra modi government

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts