IMPIMP

7th Pay Commission | नवीन वर्षात केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळेल भेट, 26 हजार रुपये होऊ शकतो किमान पगार; जाणून घ्या

by nagesh
DA Arrear | 7th pay commission da arrear latest update 18 months dearness allowance arrear payment option settlement

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | नवीन वर्ष 2022 केंद्र सरकारी कर्मचार्‍यांसाठी (Central Government Employees) भेट घेऊन येऊ शकते. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या किमान पगारात वाढ (Salary Hike) होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 18 हजार रुपयांऐवजी 26 हजार रुपये होऊ शकते. (7th Pay Commission)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वाढवला जाऊ शकतो फिटमेंट फॅक्टर
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होऊ शकते. केंद्रीय कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्यासाठी
फक्त फिटमेंट फॅक्टरचा वापर केला जातो.

मोदी सरकारने (Modi Government) फिटमेंट फॅक्टर वाढवल्यास कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 26,000 रूपयांपर्यंत वाढू शकते. अर्थसंकल्पापूर्वी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यास त्याची अंमलबजावणी अर्थसंकल्पापूर्वी होण्याची शक्यता आहे. (7th Pay Commission)

अनेक दिवसांपासून होतेय फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी
केंद्र आणि राज्य कर्मचार्‍याची, त्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची दीर्घकाळापासून मागणी आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरवर सरकार विचार करू शकते. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळू शकते. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर त्याचा खर्चात समावेश करता येईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सर्व भत्ते वाढतील
जर मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढले, तर महागाई भत्ताही वाढेल. महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 31 टक्के इतका आहे. DA ची गणना मूळ वेतनाशी डीए (Aearness Allowance) दराने गुणाकार करून केली जाते. म्हणजेच मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे महागाई भत्ता आपोआप वाढेल.

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission latest update 26000 salary hike Central Government Employees

हे देखील वाचा :

BJP Somuveer Raju | ‘भाजपला मत द्या, 70 रुपयात दारू देऊ’, भर सभेत आंध्रप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सोमवीर राजू यांचे आश्वासन

Pune Crime | पुण्यातील शाम सोनटक्के खून प्रकरणातील आरोपी सॅन्डी उर्फ संदीप चव्हाणला जामीन मंजूर

Beed Crime | भाजप जिल्हाध्यक्षाच्या शेतातील पत्त्याच्या क्लबवर पोलिसांची छापोमारी; 75 लाखांचा मुद्देमाल जप्त, राजेंद्र म्हस्केंसह 50 जणांविरुद्ध FIR

Related Posts