IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना होणार दुहेरी आनंद, DA सोबत आणखी एक वाढ !

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission government will hike da before dussehra see detail here

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन 7th Pay Commission | केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांना (Central Govt Employee) लवकरच दुहेरी आनंद मिळू शकतो. वास्तविक, एकीकडे सरकार कर्मचार्‍यांचा डीए वाढवू (DA Hike) शकते. तर दुसरीकडे, अशी देखील शक्यता आहे की, फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढवण्याबाबत मोठी घोषणा होऊ शकते. असे झाले तर रक्षाबंधन (Raksha Bandhan) सणाच्या दिवशी केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना दुहेरी लाभ होईल. कारण त्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. (7th Pay Commission)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वाढू शकतो फिटमेंट फॅक्टर

डीएसोबतच त्यांचा फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) ही वाढवण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून करत आहेत. सध्या तो 2.57 टक्के आहे, तो वाढवून 3.68 टक्के करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कर्मचार्‍यांच्या फिटमेंट फॅक्टरवर निर्णय येईल अशी आशा पूर्वीच्या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली होती, परंतु तसे झाले नाही. आता पुन्हा एकदा डीए वाढीच्या अपेक्षेने या विषयावरही चर्चा सुरू झाली आहे.

असा समजून घ्या फिटमेंट फॅक्टर

फिटमेंट फॅक्टर सर्व केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांचे मूळ वेतन ठरवते. म्हणजेच कर्मचार्‍यांना मिळणार्‍या पगारात त्याचा मोठा वाटा असतो. त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात अडीच पटीने वाढ होते. (7th Pay Commission)

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्रीय कर्मचार्‍यांचे वेतन भत्त्यांव्यतिरिक्त त्यांचे मूळ वेतन आणि फिटमेंट घटकाच्या आधारावर निश्चित केले जाते. म्हणजेच या वाढीमुळे पगार वाढणार हे नक्की.

2016 मध्ये झाली होती शेवटची वाढ

शेवटच्या वेळी 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढवण्यात आला होता. त्याच वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. यासंदर्भातील मीडिया रिपोर्टनुसार, महागाईच्या या युगात डीए वाढवण्यासोबतच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे. याशिवाय सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 5 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचीही शक्यता आहे.

DA मध्ये 5 टक्के वाढ शक्य

सरकारने यावर्षी मार्च महिन्यातच कर्मचार्‍यांच्या भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली होती. या वाढीनंतर केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळणारा डीए 31 टक्क्यांवरून 34 टक्के करण्यात आला आहे. यात पाच टक्क्यांनी वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्क्यांपर्यंत वाढेल. डीए वाढवण्याची घोषणा 31 जुलैला होऊ शकते, असे बोलले जात आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सरकार अशा प्रकारे ठरवते DA

सरकार AICPI Index च्या आधारे महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेते.
एआयसीपीआय निर्देशांकाची आकडेवारी दर्शवते की यावेळी डीए 4-5 टक्क्यांनी वाढू शकतो.
मात्र, सरकारने याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही.
सरकारने महागाईचे आकडे लक्षात घेऊन कर्मचार्‍यांचा डीए वाढवला तर 50 लाख केंद्रीय कर्मचार्‍यांसह 65 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल.

येथे समजून घ्या Salary चे कॅलक्युलेशन

सरकारने कर्मचार्‍यांचा डीए 34 टक्क्यांवरून 39 टक्के केल्यास पगारात मोठी वाढ होणार आहे.
सध्या जर एखाद्या कर्मचार्‍याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर 34 टक्क्यांनुसार त्याचा महागाई भत्ता 6,120 रुपये होतो.
आता तो 39 टक्के झाला तर कर्मचार्‍यांना 7,020 रुपये महागाई भत्ता मिळेल.
सरकारी कर्मचार्‍यांना मिळणारा डीए हा त्यांच्या आर्थिक मदत सॅलरी स्ट्रक्चरचा भाग आहे.

Web Title : – 7th Pay Commission | 7th pay commission latets update govt may increase fitment factor soon with da hike

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Meeting | शेतकऱ्यांना 50 हजारांचे अनुदान, प्रति युनिट 1 रुपये वीज सवलत; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

PM Kisan | पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-KYC) मोहिमस्तरावर करा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Maharashtra Cabinet Meeting | शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ योजना, अतिवृष्टी, पूरग्रस्तांचा देखील समावेश; मंत्रिमंडळातील 13 महत्त्वाचे निर्णय

Related Posts