IMPIMP

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बेसिक सॅलरीत होईल किमान 96000 रुपयांची वाढ, 1 सप्टेंबरपासून होऊ शकते लागू

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission update on fitment factor basic salary to rs 26000 pm 96000 annual will increse in 1september narendra modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission | मोदी सरकार (Modi Government) लवकरच फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढवण्याला मान्यता देऊ शकते.  3 ऑगस्ट रोजी होणार्‍या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत (Modi Government Cabinet Meeting) याबाबत निर्णय होऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, जर सरकारने याला मंजुरी दिली तर 1 सप्टेंबरपासून कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते. कर्मचार्‍यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपये होईल. म्हणजेच एका महिन्यात 8,000 रुपये आणि वार्षिक 96,000 रुपये मूळ वेतनात वाढ होईल. (7th Pay Commission)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

वाढणार सरकारी कर्मचार्‍यांचा पगार

सध्या कर्मचार्‍यांना 2.57 टक्के आधारावर फिटमेंट फॅक्टर अंतर्गत पगार मिळतो, जे वाढवून 3.68 टक्के केले तर कर्मचार्‍यांचे किमान वेतन 8,000 रुपयांनी वाढेल.

याचा अर्थ केंद्र सरकारी कर्मचार्‍यांचे किमान वेतन 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढणार आहे. वार्षिक मूळ वेतन 96,000 रुपयांनी वाढेल. यासह, भत्ते देखील वाढतील कारण ते बहुतांशी मूळ वेतनाशी लिंक असतात. सध्या किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. (7th Pay Commission)

इतका वाढेल पगार

फिटमेंट फॅक्टर 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवल्यास कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 26,000 रुपये होईल. सध्या जर तुमचा किमान पगार रु. 18,000 असेल, तर भत्ते वगळून, तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260 रुपये (18,000 X 2.57 = 46,260) मिळतील. आता जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर तुमचा पगार 95,680 रुपये (26000 X 3.68 = 95,680) होईल.

मूळ वेतन

केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या.
प्रवेश स्तरावरील मूळ वेतन दरमहा 7,000 रुपये वरून 18,000 रुपये करण्यात आले,
तर सर्वोच्च स्तर म्हणजेच सचिवाचे वेतन 90,000 रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आले.
वर्ग 1 अधिकार्‍यांसाठी, सुरुवातीचे वेतन 56,100 रुपये होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission update on fitment factor basic salary to rs 26000 pm 96000 annual will increse in 1september narendra modi government

हे देखील वाचा :

Vijay Shivtare | शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी

Maharashtra Politics Palghar Shivsena | उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का ! पालघर जिल्ह्यातील खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात

Supreme Court On Rape Case | ‘संबंध’ बिघडल्यावर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही – सुप्रीम कोर्ट

Related Posts