IMPIMP

7th Pay Commission | पेन्शनर्सच्या खात्यात लवकरच जमा होतील ‘या’ भत्त्याचे हजारो रुपये, सरकारने केली घोषणा

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission da hike update employees to get da upto 2 lakhs in their salary account as 18 months da arear

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – 7th Pay Commission | 2022 मध्ये पेन्शनधारकांसाठी (Pensioners) चांगली बातमी येत आहे. सरकारने वाढीव महागाई मदत (Dearness Relief, DR) त्यांच्या पेन्शन खात्यात जमा करण्यास मान्यता दिली आहे. याचा फायदा करोडो पेन्शनधारकांना होणार आहे. (7th Pay Commission)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सरकारने बँकांना म्हटले आहे की, ज्या पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे त्यांच्या पेन्शनची गणना त्यानुसार करण्यास सुरू करावी. बँकांनी संबंधित विभागाच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही.

सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसचे वरिष्ठ लेखाधिकारी सतीश कुमार गर्ग यांच्या म्हणण्यानुसार, बँकांनी Central Civil Pensioners, Freedom fighters (SSS Yojana), Justices of the Supreme Court, Members of Parliament आणि इतर पेन्शनधारकांना लवकरात लवकर निधी जारी केला पाहिजे.

यामध्ये त्यांच्या विभागांनी केलेल्या वाढीचा समावेश असेल. त्या विभागांना यापूर्वीच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. जर पेन्शन ड्रॉइंग बँकेला ऑर्डर प्राप्त झाली नसेल, तर ते त्यांच्या पोर्टलवर त्याची माहिती मिळवू शकतात. (7th Pay Commission)

या विभागांना दिले आदेश

  • Department of Pension and Pensioners’ Welfare (DoPPW)
  • Freedom Fighters & Rehabilitation (FFR) Division, Ministry of Home Affairs
  • Department of Justice
  • Ministry of Civil Aviation & Tourism
  • Department of Public Enterprises

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सरकारने यापूर्वीच स्वातंत्र्य सैनिकांचा महागाई मदत भत्ता (DR) वाढवला आहे. स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनधारकांना महागाई सवलतीचे सुधारित दर 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आले आहेत. त्यांची पेन्शन 3000 रुपयांवरून 9000 रुपये करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने 28 जुलै 2021 रोजी निर्देश दिले होते, जे 1 जुलै 2021 पासून स्वातंत्र्य सैनिकांना 29% महागाई सवलत देण्याबाबत आहे.

आता किती पेन्शन मिळणार?

  • अंदमानातील माजी राजकीय कैदी/पती-पत्नींचे पेन्शन 30,000 रुपये प्रति महिना वरून 38,700 रुपये करण्यात आली आहे.
  • भारताबाहेर बळी पडलेले स्वातंत्र्यसैनिक. यांना 28,000 रुपयांवरून 36,120 रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाईल.
  • NA सह इतर स्वातंत्र्यसैनिकांना 26,000 वरून 33,540 महिना पेन्शन मिळेल.
  • आश्रित पालक/पात्र मुलीला 15,000 रुपये प्रति महिना 19,350 रुपये पेन्शन मिळेल.

हे देखील वाचा :

Pune Crime | फसवणूक प्रकरणी हॉटेल ‘साहिल’चे नितीन नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

Modi Government | महाराष्ट्र सरकारला खोटे ठरवण्याचा डाव? मोदी सरकारकडून ‘ते’ वृत्त चुकीचं असल्याचा खुलासा

Pune Crime | ‘वसुली’साठी अपहरण करुन 4 दिवस ठेवले डांबून; सिंहगड रोड पोलिसांकडून दोघांना अटक

Related Posts