IMPIMP

7th Pay Commission Update | सरकारी कर्मचार्‍यांना मिळेल डबल भेट ? ऑगस्टमध्ये होऊ शकते मोठी घोषणा

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission update on fitment factor employees may get 95k in new year

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission Update | केंद्र सरकार (Central Government) ऑगस्टमध्ये केंद्रीय कर्मचार्‍यांना (Central Employees) खुशखबर देऊ शकते. केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढविण्याबाबत (DA Hike) पुढील महिन्यात निर्णय घेतला जाऊ शकतो. यासोबतच त्यांचा थकित डीए (Due DA) जमा करण्याबाबतही घोषणा केली जाऊ शकते. अशाप्रकारे सरकार कर्मचार्‍यांना दुहेरी भेट देऊ शकते. सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता वाढविण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अशावेळी ऑगस्टमध्ये सरकार डीए वाढीबाबत मोठी घोषणा करू शकते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (7th Pay Commission Update)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मार्चमध्ये वाढला होता डीए

सरकारने यावर्षी मार्चमध्ये कर्मचार्‍यांच्या डीएमध्ये वाढ केली होती. त्यानंतर डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना 34 टक्के दराने डीए मिळत आहे. डीए हा कर्मचार्‍यांच्या पेमेंट स्ट्रक्चरचा भाग आहे. सरकार महागाईच्या दरानुसार डीए ठरवते. जेणेकरून कर्मचार्‍यांच्या राहणीमानावर कोणताही परिणाम होणार नाही. (7th Pay Commission Update)

थकित डीए जमा करणे

केंद्रीय कर्मचारी त्यांच्या 18 महिन्यांच्या डीएची थकबाकी भरण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. कोविडमुळे सरकारने जानेवारी 2020 ते जून 2021 पर्यंत कर्मचार्‍यांचा डीए रोखून धरला होता. कर्मचार्‍यांकडून त्यांच्या थकित डीएची मागणी सातत्याने केली जात आहे. बातम्यांनुसार, सरकारने पुढील महिन्यात थकित डीए जमा केला, तर ते वाढलेले 11 टक्के पैसे जोडून खात्यात टाकतील.

महागाई दर जास्त

केंद्रीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही सरकार घेऊ शकते.
चलनवाढीचा दर सलग अनेक महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या आकड्यापेक्षा जास्त आहे.
आरबीआयने चलनवाढीचा दर 2 ते 6 टक्के ठेवला आहे. तर किरकोळ महागाई (Retail Inflation) 7.01 टक्के आहे.

ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स (AICPI) च्या आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डीए वाढीचा अंदाज आहे.
ही आकडेवारी कामगार मंत्रालयाने (Labour Ministry) जाहीर केली आहे.
जूनमधील एआयसीपीआय डेटामध्ये 0.2 अंकांची वाढ झाली आहे. जूनमध्ये तो 129.2 वर गेला आहे जो मे मध्ये 129 होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

किती होऊ शकते वाढ

AICPI च्या वाढीव आकडेवारीवरून केंद्रीय कर्मचार्‍यांचा डीए 4 ते 5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्यास डीए 38 टक्के होईल.
सरकारने डीएमध्ये 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.

किती वाढेल सॅलरी

जर तुम्ही हिशेब केला तर कमाल बेसिक सॅलरी 56,900 रुपये नुसार 34 टक्के डीए 19,346 रुपये होतो.
त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्यास 38 टक्के डीए 21,622 रुपये होईल. म्हणजेच पगार दरमहा 2,276 रुपयांनी वाढणार आहे.

Web Title : – 7th Pay Commission Update | 7th pay commission update da hike 4 percent in august government may be announce

हे देखील वाचा :

BJP JP Nadda On Shivsena | भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डांचा मोठा दावा; म्हणाले – ‘महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर, इतर पक्षही संपतील’

Multibagger stock | एकेकाळी 2 रुपयात विकला जाणारा शेअर आज 2,000 च्या जवळ पोहचला, केवळ 5 वर्षात दिला 1000% रिटर्न

Pune Pimpri Crime | कामावर घेण्यास नकार दिल्याने गैरवर्तन करुन महिलेचा विनयभंग, आरोपी गजाआड

Related Posts