IMPIMP

Aakash BYJU’S | आकाश बायजू’ज ने मुलींच्या समावेशकता आणि सक्षमीकरणासाठी ‘एज्युकेशन फॉर ऑल’ केले लॉच

by nagesh
Aakash BYJU’S | Aakash BYJU’S Launches ‘Education for All’ towards Inclusivity and Empowerment of the Girl Child

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Aakash BYJU’S | भारत सरकारच्या (Government Of India) ‘आझादी का अमृत महोत्सव‘ उपक्रमाचे औचित्य
साधून, चाचणी पूर्वतयारी सेवांमध्ये राष्ट्रीय अग्रेसर असलेल्या आकाश बायजू’ज (Aakash BYJU’S), खाजगी कोचिंगच्या क्षेत्रात विद्यार्थिनींच्या
सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठी मोहीम आयोजित करत आहे. ‘एज्युकेशन फॉर ऑल (Education for All) ‘ द्वारे उच्च
शिक्षण (Higher Education), वंचित कुटुंबातील सुमारे 2,000 इयत्ता सातवी-बारावीच्या विद्यार्थ्यांना, विशेषत: मुलींना मोफत (एनईईटी NEET) आणि
(जेईई JEE) कोचिंग आणि शिष्यवृत्ती (Scholarship) प्रदान करणारा देशव्यापी प्रकल्प राबवित आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आज संपूर्ण भारतात एकाच वेळी ४५ ठिकाणी हा प्रकल्प लाँच करण्यात आला आणि मुख्य कार्यक्रम दिल्लीतील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल, एरोसिटी येथे झाला ज्याला अध्यक्ष जे. सी. चौधरी (J. C. Chaudhary), आकाश चौधरी (Akash Chaudhary), व्यवस्थापकीय संचालक आणि अभिषेक माहेश्वरी (Abhishek Maheshwari), सीईओ, आकाश बायजू’ज आणि कंपनीच्या इतर अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला आकाश बायजू’ज (Aakash BYJU’S) चे माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते जे (एएनटीएचई – ANTHE) च्या माध्यमातून संस्थेचा भाग बनले होते. माजी विद्यार्थ्यांचा त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

प्रकल्पानुसार, सर्व मान्यता प्राप्त विद्यार्थी आकाश बायजू’ज संस्थेची प्रमुख शिष्यवृत्ती परीक्षा नॅशनल टॅलेंट हंट एक्झाम – 2022 (एएनटीएचई 2022, 5-13 नोव्हेंबर, 2022 दरम्यान देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने होणार आहेत. सर्वोच्च 2,000 विद्यार्थ्यांना आकाश बायजू’ज च्या (एनईईटी) आणि आयआयटी-जेईई कोचिंग प्रोग्राम्ससाठी विशेष बाबींवर आधारित मोफत कोचिंग दिले जाईल. (Aakash BYJU’S)

लाभार्थी विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी, आकाश निवडक एनजीओ सोबत भागीदारी करेल, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, फक्त मुलगी आणि एकल पालक (आई) विद्यार्थ्यांना नामनिर्देशित करू शकतात. आकाश बायजू’ज चे पॅन इंडिया नेटवर्क आहे ज्यामध्ये जवळपास 285+ केंद्रे आहेत, जी देशातील कोणत्याही कोचिंग संस्थेसाठी सर्वाधिक आहे. प्रत्येक केंद्रात सरासरी 9 वर्ग चालवले जातात.

‘’एज्युकेशन फॉर ऑल’ उपक्रमावर बोलताना, आकाश बायजू’ज’चे (Aakash BYJU’S) व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी म्हणाले, “इतक्या दिवसांपासून या उद्योगात राहून, वैद्यकीय (Engineering Education) आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या (Medical Education) आकांक्षा आपल्या देशातच वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. आमच्या तरुण पिढीला या दोन क्षेत्रांबद्दल आणि स्व-विकास आणि सामाजिक योगदानासाठी परवडणार्‍या संधींबद्दल त्यांना भीतीयुक्त आदर आहे. तथापि, असे लाखो विद्यार्थी आहेत ज्यांना खाजगी कोचिंग परवडत नाही जे त्यांची प्रवेश परीक्षेत अपयशी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढवू शकतात. परवडण्याच्या समस्येला जोडणारा मुद्दा म्हणजे लिंग असमानता, जिथे कुटुंबे एका विशिष्ट इयत्तेपेक्षा मुलींच्या शिक्षणावर जास्त खर्च करण्यासाठी पुढे येत नाहीत. या संदर्भांमुळे वंचित समाजातील विद्यार्थ्यांचे आणि सर्वसाधारणपणे मुलींचे मनोधैर्य कमी होते. ‘एज्युकेशन फॉर ऑल’ च्या माध्यमातून आम्ही या विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या कोचिंगच्या संधींचा विस्तार आणि व्याप्ती वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न करत आहोत.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

लाभार्थी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कोचिंगच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “आकाश बायजू’ज च्या जलद विस्तारणाऱ्या नेटवर्कमधील आमच्या प्रत्येक केंद्राला केवळ कोचिंगमध्येच नव्हे तर सर्वसमावेशकता आणि महिला सक्षमीकरणातही उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून रूपांतरित करण्याचा विचार आहे. आम्हाला खात्री आहे की या उपक्रमाला गरीब कुटुंबे आणि एकल मुलगी किंवा एकल पालक किंवा दोघांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल.”

‘एज्युकेशन फॉर ऑल’ (Aakash BYJU’S) उपक्रमाच्या शिष्यवृत्ती नियमित (एएनटीएचई) शिष्यवृत्ती व्यतिरिक्त आहेत.
पूर्वीप्रमाणेच, (एएनटीएचई) 2022, 13 वी आवृत्ती, गुणवंत विद्यार्थ्यांना 100% पर्यंत शिष्यवृत्ती ऑफर करेल – ते
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना रोख बक्षिसे देखील ऑफर करेल.
याशिवाय, 5 विद्यार्थी पालकांसह एनएएसएची मोफत सहल देखील जिंकतील.
लाँच झाल्यापासून, (एएनटीएचई) ने 33 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊ केली आहे.

(एएनटीएचई) ही एक तासाची परीक्षा आहे. (एएनटीएचई) ऑनलाइन परीक्षा सर्व परीक्षेच्या
दिवसांमध्ये सकाळी 10:00 ते संध्याकाळी 07:00 दरम्यान घेतली जाईल,
तर ऑफलाइन परीक्षा 6 आणि 13 नोव्हेंबर 2022 रोजी दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल,
सकाळी 10:30 AM – 11:30 AM आणि संध्याकाळी 04:00 PM ते 05:00 PM.
आकाश बायजू’ज च्या देशभरातील सर्व 285+ केंद्रांवर घेण्यात येईल.
विद्यार्थी त्यांच्यासाठी सोयीस्कर एक तासाचा स्लॉट निवडू शकतात.

(ANTHE) ला एकूण 90 गुण आहेत. यात 35 बहु-निवडक प्रश्नांचा समावेश आहे ज्या ग्रेड आणि स्ट्रीममध्ये विद्यार्थी इच्छुक आहेत.
त्यावर आधारित राहील. इयत्ता सातवी-नवीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र,
गणित आणि मानसिक क्षमता या विषयांचे प्रश्न असतील.
वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,
जीवशास्त्र आणि मानसिक क्षमता समाविष्ट आहे, तर त्याच वर्गातील अभियांत्रिकी इच्छूकांसाठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र,
गणित आणि मानसिक क्षमता समाविष्ट आहे. आणि इयत्ता अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचे (एनईईटी) चे उद्दिष्ट आहे,
त्यांचे प्रश्न भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र आधारित आणिअभियांत्रिकी
इच्छुकांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितावर आधारित असतील.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Aakash BYJU’S | Aakash BYJU’S Launches ‘Education for All’ towards Inclusivity and Empowerment of the Girl Child

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही, काँग्रेसकडून आघाडी फुटण्याचे संकेत

Pune Crime | ‘मी गुन्हेगार आहे, मला पोलीस स्टेशनचा काही फरक पडत नाही’; जीवे मारण्याची धमकी देणार्‍या दोघा सावकारांना अटक

Sunil Raut | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन हटवणाऱ्यांचा सूड घेणार, ठाकरे गटातील आमदाराचा खळबळजनक इशारा

Related Posts