IMPIMP

Aamir Khan | आमिर खानच्या आयुष्यातील ‘तो’ प्रसंग सांगताना त्याला आश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

by nagesh
Aamir Khan | aamir khan cried remembering his father struggle during interview

सरकारसत्ता ऑनलाईन  – Aamir Khan | आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आदळला होता. त्याच्या या चित्रपटानंतर आमिर खानने चित्रपटसृष्टीत थोडा काळ ब्रेक घेतला. अलीकडेच त्यांनी दिलेला एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तो भावूक झाल्याचे दिसत होते. (Aamir Khan)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुलाखतीत आमिर खानला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र काही प्रश्नांनी तो इतका भावूक झाला की त्यांनी त्याच्या जुन्या आठवणी सांगण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. आमिर खानला ते दिवस आठवले जेव्हा तो फक्त दहा वर्षाचा होता आणि त्यावेळी त्याच्या कुटुंबाची परिस्थिती खूप हालाकीची होती. संपूर्ण घटना सांगताना आमिर म्हणाला, “वडिलांनी लॉकेट नावाचा चित्रपट बनवण्यासाठी लोकांकडून कर्ज घेतले होते. आठ वर्ष उलटून गेले तरी हा चित्रपट बनला नव्हता. त्यावेळी कलाकार अनेक सिनेमांमध्ये एकाच वेळी काम करत होते. नवीन दिग्दर्शकांसाठी तर त्यांच्याकडे वेळ मिळणे अडचणीचे होते. अशा परिस्थितीमुळे माझ्या अब्बाजानला खूप त्रास झाला होता”. (Aamir Khan)

पुढे बोलताना अमीर म्हणाला “हा चित्रपट पूर्ण न झाल्यामुळे आम्हा सर्वांना रस्त्यावर यावे लागले.
माझ्या वडिलांनी अनेक चित्रपटात काम केले. मात्र त्यांच्याकडे पुरेसे असे पैसे नव्हते.
अनेक देणेकरींचे त्यांना सतत फोन यायचे फोनवरून नेहमीच त्यांचे भांडण सुरू असायचे”.
या सगळ्या गोष्टी सांगताना अमीर इतका भावूक झाला की काही वेळ तो मुलाखतीतून निघून देखील गेला होता.
सध्या आमिर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो काजोलच्या ‘सलाम वेंकी’ चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Aamir Khan | aamir khan cried remembering his father struggle during interview

हे देखील वाचा :

Pune Crime | श्वानाला दगड मारल्याने एकावर कुर्‍हाडीने वार; बाणेरमधील घटना

Pune Crime | हॉटेलचे भाडे मागितल्यावरून टोळक्याकडून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; धनकवडीमधील घटना

Uddhav Thackeray | बेळगाव महाराष्ट्रात यावे यासाठी मुख्यमंत्री कामाख्या देवीला नवस करणार की नाहीत? – उद्धव ठाकरे

Related Posts