IMPIMP

Aarey Metro Car Shed | सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला दणका, पुढील सुनावणीपर्यंत ‘आरे’तील एकही झाड न तोडण्याचे आदेश

by nagesh
Aarey Metro Car Shed | mumbai aarey metro car shed no further trees to be cut in any manner whatsoever till next date of hearing says supreme court

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Aarey Metro Car Shed | मेट्रो – 3 प्रकल्पाच्या (Metro-3 Project) कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्या विरोधात (Tree Felling) पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्य सरकारच्या (Maharashtra State Government) वृक्षतोडविरोधात निर्देश दिले आहे. मेट्रो – 3 मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणी पर्यंत आरेतील एकही झाड कापू नये असे निर्देश आज (शुक्रवार) सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला Mumbai Metro Rail Corporation (MMRC) दिले आहे. पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती ललित (Justice Lalit) यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Solicitor General Tushar Mehta) यांनी मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्यावतीने बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, आरेमधील कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात आली नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये ‘जैसे थे’चे आदेश दिल्यानंतर एकही झाड तोडले नसल्याचे कोर्टाला सांगितले. मात्र, या दरम्यानच्या काळात काही झुडपे, तण वाढली होती. ती काढण्यात आली आहे. त्याशिवाय काही झाडांच्या फांद्या कापण्यात आल्या आहेत. मात्र कोणतीही वृक्षतोड झाली नसल्याचा दावा मुंबई मेट्रोकडून करण्यात आला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ज्येष्ठ वकील चंदेर उदय सिंह (Senior Advocate Chander Uday Singh) यांनी याचिकाकर्त्यांच्या बाजूने बाजू मांडली.
‘जैसे थे’ चे आदेश असतानाही आरेतील मेट्रो कारशेड (Aarey Metro Car Shed) प्रकल्पासाठी पुन्हा एकदा वृक्षतोड सुरु करण्यात आली आहे.
कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथे मेट्रो कारशेड तयार करावा असे समितीचा अहवाल असतानाही मेट्रो अधिकाऱ्यांनी आरेमधील कारशेडसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
या भागातील झाडे कापण्यात येत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

Web Title :-  Aarey Metro Car Shed | mumbai aarey metro car shed no further trees to be cut in any manner whatsoever till next date of hearing says supreme court

हे देखील वाचा :

Warm Water Benefits | गरम पाण्याचे हे 5 फायदे तुम्हाला माहितीच नाहीत, अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय

Shivsena | शिवसेनेत मोठ्या खांदेपालटाची शक्यता, आदित्य ठाकरेंकडे येणार ‘हे’ पद, तर तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय होणार ?

Pune Crime | दरमहा २४ टक्के परतावाचा मोह पडला साडेचार कोटींना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने फसवणूक

Related Posts