IMPIMP

Abdul Sattar | शासकीय कार्यालयांमध्ये ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हणायचं का? अब्दुल सत्तार म्हणाले…

by nagesh
Abdul Sattar | abdul sattar on compulsion of vande mataram replacing hello in government offices

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Abdul Sattar | महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम म्हणत संभाषणाला सुरुवात करतील, अशी घोषणा राज्याचे नवे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) वर्षानिमित्त केली आहे. यावर राज्याचे नवे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुनगंटीवार यांच्या घोषणेवर सत्तार यांनी गोलगोल प्रतिक्रिया दिली आहे. सत्तार यांनी म्हटले की, हॅलोसुद्धा चांगले आहे. वंदे मातरम ही चांगले आहे. गुड मॉर्निंग आणि गुड नाईटही चांगले आहे. मुनगंटीवार यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर लोकांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. (Abdul Sattar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सांस्कृतिक कार्यमंत्री झाल्यानंतर संबंधित घोषणा करताना सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, वंदे मातरम (Vande Mataram) हे आपले राष्ट्रगान आहे. हा केवळ एक शब्द नसून भारतीयांच्या भारतमातेविषयीच्या भावनांचे प्रतिक आहे. भारतीय मनाचा मानबिंदू असलेल्या या रचनेतील एकेक शब्द उच्चारताच देशभक्तीची भावना जागृत होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण हॅलो या विदेशी शब्दाचा त्याग करून
त्याऐवजी शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे वंदे मातरम म्हणत संभाषण सुरू करणार आहोत.
1800 साली टेलिफोन अस्तित्वात आल्यापासून आपण हॅलो या शब्दाने संभाषण सुरू करत आहोत.

Web Title :- Abdul Sattar | abdul sattar on compulsion of vande mataram replacing hello in government offices

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | ‘विनायक मेटेंचं बलिदान वाया जाऊन देणार नाही’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

OLA Electric Car | Independence Day ला OLA चा डबल धमाका, इलेक्ट्रिक कारची घोषणा, 4 सेकंदात पकडणार 100 चा वेग

Vinayak Mete Death | विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीचा मृत्यूवर संशय, म्हणाल्या…

Related Posts