IMPIMP

Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा महिला मोर्चा मंत्रालयावर

by nagesh
Abdul Sattar | ncp women volunteer march on ministry against abdul sattar statement on supriya sule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यामुळे महिला कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेच्या निषेधात हा मोर्चा निघाला होता. यावेळी अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा, अशा घोषणा महिलांनी दिल्या. यावेळी अब्दुल सत्तारांच्या फोटोला काळे फासण्यात आले आणि जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आले. यावेळी अब्दुल सत्तारांसह शिंदे सरकार (Shinde Government) विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महिला कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली. या मोर्चात राष्ट्रवादी काँगेसच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thmombare Patil) यांच्यास इतर महिला कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात भाजपच्या एका पदाधिकारी महिलेने
मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) विनयभंगांचा गुन्हा दाखल केल्यानंतर राज्य सरकार विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) संघर्ष सुरु झाला आहे.
राष्ट्रवादी त्यात अग्रणी आहे. जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली होती.
दरम्यान, आज आम्ही आंदोलन करत असताना, आम्हाला पोलिसांनी हात लाऊन बाजुला केले.
म्हणून त्यांच्यावर वियनभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिल्या कार्यकर्त्यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Abdul Sattar | ncp women volunteer march on ministry against abdul sattar statement on supriya sule

हे देखील वाचा :

Girish Mahajan | ‘जितेंद्र आव्हाड प्रकरण सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे’ – गिरीश महाजन

Sachin Vaze | सचिन वाझेंचा जामीन अर्ज 18 नोव्हेंबरला निकालासाठी

Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदे 50 आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार त्याबद्दल बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

Chandrashekhar Bawankule | ‘महाविकास आघाडीच्या लोकांनी यावर बोलूच नये!’; अजित पवारांच्या टीकेवर चंद्रशेखर बावनकुळेंचे उत्तर

Related Posts