IMPIMP

Abdul Sattar | कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना केले चॅलेंज, म्हणाले – ‘मी राजीनामा देण्यासाठी तयार, पण…’

by nagesh
Abdul Sattar | so i resign in two days abdul sattars challenge to aditya thackeray for election

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे (State Government) केली आहे. तसेच विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा राजीनामा मागितला आहे. त्यावर अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी भाष्य करत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

टाटा एअरबस प्रकल्प (Tata Airbus Project) बाहेर कसा गेला, त्यावेळी तारीख काय होती, हे आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) बारकाईने पाहावे. त्यांनी नीट अभ्यास केल्यास त्यांच्या लक्षात येईल की, 21 सप्टेंबर 2021 मध्ये हा प्रकल्प राज्यातून गेला. त्यावेळी मुख्यमंत्री यांचे वडील म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होते. आणि जे प्रकल्पावर बोलत आहेत, ते कॅबिनेट मंत्री होते. मग त्यावेळी प्रकल्पात काही देवाण घेवाण झाली नाही, म्हणून हा प्रकल्प राज्याबाहेर गेला का, अशी शंका उपस्थित होते. छोटा पप्पू पहिले बोलेले असते, तर राज्यावर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत सत्तारांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. लोकांना खोटी माहिती देऊन, त्यांच्यात संभ्रम निर्माण करुन लोकांची दिशाभूल करण्याचे काम आदित्य ठाकरे करत आहेत, असे सत्तार (Abdul Sattar) यावेळी म्हणाले.

तसेच अब्दुल सत्तार यांनी विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यावर देखील मला प्रतिक्रिया दिली आहे.
मी राजीनामा देण्यासाठी तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी. तसेच, चंद्रकांत खैरे
(Chandrakant Khaire) आणि आदित्य ठाकरे यांनी माझ्याविरोधात सिल्लोडमधून निवडणूक लढवून जिंकून
दाखवावी. गेल्या लोकसभेत खैरे यांना जलील यांच्या मार्फत मीच पराभव दाखविला होता. आता खैरे चांदीची गदा घेऊन फिरत आहेत. पण, त्यांच्या गदेचा सामना करण्यासाठी आमची ढाल तयार आहे, असे सत्तार म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Abdul Sattar | so i resign in two days abdul sattars challenge to aditya thackeray for election

हे देखील वाचा :

Chickenpox in Children | जाणून घ्या मुलांना चिकनपॉक्स झाल्यास काय करावे आणि काय करू नये?

Jalgaon ACB Trap | क्राईम मिटींगला येण्याच्या तयारीत असलेले 2 पोलिस अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, संपुर्ण जिल्ह्यात खळबळ

Brain Stroke | डोकेदुखी किंवा चक्कर येणे, ‘या’ अतिशय सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष; ब्रेन स्ट्रोकचा वाढू शकतो धोका!

Related Posts