IMPIMP

ACB Trap On Headmaster | विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

June 8, 2024

बीड : – ACB Trap On Headmaster | ट्रान्सफर सर्टिफिकेटच्या दुसऱ्या प्रतीसाठी तीन हजार रुपये लाच घेताना केज येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाला (Kaij School Headmaster) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले (Beed ACB Trap). धनराज सखाराम सोनवणे Dhanraj Sakharam Sonwane (रा. सारणी आनंदगाव, ता. केज) असे लाचखोर मुख्याध्यापकाचे नाव आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.7) दुपारी शाळेच्या आवारात सापळा रचून केली. (Beed Bribe Case)

केज शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक धनराज सोनवणे यांच्याकडे त्यांच्या शाळेतील एका माजी विद्यार्थ्याने 12 वी उत्तीर्ण झालेल्या टीसी ची द्वितीय प्रत मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी मुख्याध्यापक सोनवणे यांनी त्याच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर विद्यार्थ्याने बीड एसीबीकडे याबाबत तक्रार केली. एसीबीच्या पथकाने पडताळणी करुन शाळेच्या आवारात सापळा रचला. शाळेच्या प्रवेशद्वारावर लाचेची रक्कम स्वीकारताना धनराज सोनवणे याला रंगेहाथ पकडले.

ही कारवाई छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद जाधव, पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एसीबीचे पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, श्रीराम गिरम, हनुमान गोरे, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे, स्नेहलकुमार कोरडे यांच्या पथकाने केली.