IMPIMP

ACB Trap On Police Havaldar | दोन हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Nashik Central Jail | nashik central jail 10 to 12 prisoners attacked on policeman

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन ACB Trap On Police Havaldar | ओझर पोलीस ठाण्यात (Ozar Police Station) पोलीस हवालदार (Police Havaldar) म्हणून नियुक्त असलेले कारभारी भिला यादव (Karbhari Bhila Yadav) यांना तक्रारदाराकडून दोन हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Nashik) रंगेहाथ पकडले. पंचवटीतील सीतागुंफा (Sita Gufa) परिसरात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Nashik) रविवारी (दि.12) सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी यादव याच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap On Police Havaldar)

धनादेश न वटल्याप्रकरणी (Check Bounce) दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडे यादव यांनी केली होती. न्यायालयाने तक्रारदाराला पकड वॉरंट (Arrest warrant) बजावले होते. त्यानुसार यादव यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला व त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी पकड वॉरंटमध्ये जामीनदार (Guarantor) यांचे कागदपत्रे घेऊन मदत करण्याचे आमिष दाखवले. त्या मोबदल्यात यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. (ACB Trap On Police Havaldar)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (Nashik Bribe Case) संपर्क साधला.
यानंतर पथकाने पडताळणी करुन पंचवटी येथील सीतागुंफा परिसरात रविवारी सापळा रचला.
यादव यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने यादव यांना ताब्यात घेतले.
यादव यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Web Title :- ACB Trap On Police Havaldar | Police Havaldar Arrest In Bribe Case of Two thousands Nashik ACB Crime News

हे देखील वाचा :

ACB Trap On Two Police | जुगाराचा अड्डा सुरु ठेवण्यासाठी 40 हजाराची लाच घेताना दोन पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Thane Police Website Hack | जगभरातील मुस्लिमांची माफी मागण्याचे आव्हान ! प्रेषित अवमान प्रकरणी ठाणे पोलीस दलाची वेबसाईट ‘हॅक’; देशातील सरकारी कार्यालयांच्या अनेक वेबसाईटवर हल्ला

Pune PMC Recruitment 2022 | पुणे महापालिकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! पुढील आठवड्यात अभियंता आणि लिपिकांच्या मेगा भरतीसाठी जाहिरात

Related Posts