IMPIMP

ACB Trap On Police Inspector In Maharashtra | लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह तिघे ‘लाच लुचपत’च्या ‘जाळ्यात’

by nagesh
ACB Demand Case | Anti-Corruption News: ACB files case against Assistant Police Inspector Vivek Ashok Pawar in bribery case of 25 thousand

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – ACB Trap On Police Inspector In Maharashtra | एम डी या अंमली पदार्थाचे सेवन केले असल्याचा आरोप करुन त्याबद्दल गुन्हा दाखल न करण्यासाठी तिघांकडे १ लाख रुपयांची मागणी करुन नंतर प्रत्येकी २० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह तिघांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap On Police Inspector In Maharashtra)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस निरीक्षक सुरेशकुमार ताराचंद घुसर Police Inspector Sureshkumar Ghusar (रा. शिवपार्वती अपार्टमेंट, सोयगाव, मालेगाव शहर), पोलीस नाईक आत्माराम काशिनाथ पाटील (रा. मोचीवाडा कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव शहर) आणि खासगी व्यक्ती सैय्यद राशीद सैय्यद ,रफिक उर्फ राशीद बाटा (रा. मालेगाव) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका ३० वर्षाच्या नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. (ACB Trap On Police Inspector In Maharashtra)

तक्रारदार यांचा भाऊ व त्यांचे दोन मित्र ३ सप्टेबर रोजी जेवण करुन घरी परत जात होते.
ते एम डी या अंमली पदार्थाशी संबंधित आहेत, या कारणावरुन त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाण्यात
(Malegaon City Police Station) नेण्यात आले.
तेथे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांचा भाऊ व त्यांचे दोन मित्र यांच्यासाठी
सुरुवातीला १ लाख रुपये नंतर तक्रारदार यांचा भाऊ व त्यांचा एक मित्र यांच्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली.
तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ( Nashik ACB) तक्रार केली.
तडजोडी अंती तक्रारदार यांच्या भावासाठी २० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

प्राप्त तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,
पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव तसेच
पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर, मनोज पाटील, पोलीस अंमलदार संजय ठाकरे, नितीन नेटारे, संतोष गांगुडे यांनी गुन्हा दाखल केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- ACB Trap On Police Inspector In Maharashtra | ACB Trap On Police Inspector Sureshkumar Ghusar Malegaon City Police Station Nashik Rural Police

हे देखील वाचा :

Pune Crime | सिंहगड रोडवरील नर्‍हे परिसरात टोळक्याकडून एकाचा खून

Jasprit Bumrah | “जसप्रीत बुमराह फेरारी आहे, रोज चालणारी टोयोटा कार नाही”, PAK च्या माजी कर्णधाराने बुमराहवर टीका करणाऱ्यांना सुनावले

Mohammad Rizwan | मोहम्मद रिझवानने रचला विक्रम, अशी कामगिरी करणारा पाकिस्तानचा पहिलाच क्रिकेटपटू

Related Posts