IMPIMP

ACB Trap On Police Sub Inspector | शेतकऱ्याकडून लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure

लातूर :- ACB Trap On Police Sub Inspector | शेतातील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन भांडण झालेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Latur ACB Trap) पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस हवालदार यांना रंगेहात पकडले. एसबीच्या पथकाने ही कारवाई तहसील कार्यालयाच्या पटांगणात सापळा रचून केली. (Latur Bribe Case)

पोलीस उपनिरीक्षक दिलीप रघुत्तमराव मोरे PSI Dilip More (वय-33) आणि पोलीस हवालदार पांडुरंग दिगंबर दाडगे (वय-43) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. लातूर एसीबच्या पथकाने पोलीस हवालदार दाडगे याला तहसील कार्य़ालयाच्या पटांगणातून पकडले तर पोलीस उपनिरीक्षक मोरे याला चाकूर पोलीस ठाण्यातून (Chakur Police Station) ताब्यात घेतले.

शेतातील सामायिक बंधाऱ्यावरील झाड तोडण्याच्या कारणावरुन भांडण होऊन चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार दाडगे याला रंगेहात पकडले. तर दाडगे याला लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पीएसआय मोरे याला चाकूर पोलीस ठाण्यातून अटक केली. याप्रकरणी दोघांवर चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts