IMPIMP

ACB Trap Pune | लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार व होमगार्डवर पुणे एसीबीकडून गुन्हा दाखल

by nagesh
Kolhapur Crime | police naik who demanded a bribe of one crore from the farmer arrested by sangli acb

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – ACB Trap Pune | वॉरंटमध्ये अटक (Arrest) न करण्यासाठी 1 हजार रुपयाची लाचेची मागणी (Demand Of Bribe) करणाऱ्या पोलीस हवालदार आणि होमगार्डवर पुणे लाचलुचपत प्रतबिंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Pune) बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदार आण्णासाहेब नामदेव उगले Police Constable Annasaheb Namdev Ugale (वय-49) आणि होमगार्ड सनी शामराव गावडे (Homeguard Sunny Shamrao Gawde) यांच्याविरुद्ध सोमवारी (दि.23) गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap Pune)

याबाबत 37 वर्षाच्या व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. आरोपी आण्णासाहेब उगले हे पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) बारामती शहर पोलीस ठाण्यात (Pune Rural Police) पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून वॉरंटमध्ये (Warrant) अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB) तक्रार केली. (ACB Trap Pune)

पथकाने 5 मे आणि 6 मे रोजी तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांना वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी होमगार्ड सनी गाढवे याने एक हजार रुपये लाच मागितली. तडजोडीमध्ये 800 रुपये मागणी केली. तर पोलीस हवालदार उगले यांनी लाचेच्या मागणीला प्रोत्साहन दिले. पुणे एसीबीने सोमवारी दोघांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर (Police Inspector Pravin Nimbalkar) करीत आहेत.

Web Title :- ACB Trap Pune | Demand Of Bribe Police Officer Pune Rural Police Homeguard Anti Corruption Bureau (ACB) Pune

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Ajit Pawar On PDCC Bank Recruitment | ‘गुणवत्तेनुसार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 800 जागांची भरती होणार’ – अजित पवार

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

Rajyasabha Election | राज्यसभेसाठी संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना फॉर्म्युल्यावर संभाजीराजेंमध्ये समझोता

Related Posts