IMPIMP

Video : लिलावती रुग्णालयात पोहोचला ‘भाईजान’ सलमान ! जाणून घ्या नेमकं कारण काय

by bali123
after spotted at lilavati hospital salman khan announces he received first covid 19 vaccine

सरकारसत्ता ऑनलाईन टिम – बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) दुपारी लिलावती रुग्णालयात पोहोचला होता. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चांनी जोर धरला होता. तो रुग्णालयात का गेला, त्याची प्रकृती तर ठीक आहे ना असे अनेक सवाल केले गेले. आता खुद्द सलमान खान यानंच याबाबत खुलासा केला आहे आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

सलमाननं त्याच्या ट्विटरवरून ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यानं लिहिलं की, आज मी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्याच्या या ट्विटनंतर स्पष्ट झालं की, तो रुग्णालयात का गेला होता. ही माहिती समोर आल्यानंतर चिंतीत झालेले चाहतेही रिलॅक्स झाल्याचं दिसून आलं.

सलमाननं Salman Khan शेअर केलेलं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हे ट्विट शेअरही केलं आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभु देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नव्हतं. आता 2021 च्या ईदला हा सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय सलमान अंतिम आणि शाहरुख खानच्या पठाण सिनेमातही दिसणार आहे. इतकंच नाही तर तो किक 2 आणि कभी ईद कभी दीवाली, टायगर 3 अशा सिनेमातही काम करणार आहे.

Also Read :

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

‘देवेंद्र फडणवीस हे अहंकारी आणि लबाड, माझ्याकडे त्यांच्या प्रकरणांचा गठ्ठा !’

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

Casting Couch : ‘काम हवं असेल तर माझ्यासोबत झोप’, अंकिता लोखंडेचा निर्मात्याबद्दल ‘खळबळजनक’ खुलासा

Related Posts