IMPIMP

Ahmednagar Lok Sabha MockPoll | सुजय विखेंनी आक्षेप घेतलेल्या 40 मतदान केंद्रावर होणार ‘मॉकपोल’; निवडणूक आयोगाचे आदेश

July 17, 2024

नगर: Ahmednagar Lok Sabha MockPoll | अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये एकीकडं भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे (Sharad Pawar NCP) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये निलेश लंके यांचा अवघ्या २९ हजार मतांची विजय होऊन ते खासदार बनले होते.

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या सुजय विखे पाटील यांनी काही मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार या केंद्रावरील मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आक्षेप घेण्यात आलेल्या या ४० मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला दिल्या आहेत.

४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर १० जून रोजी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनची आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी असा अर्ज पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केला होता.

यापार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला काल एक पत्र लिहून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इथं आता मॉकपोल होणार आहे. पण आता ही प्रक्रिया नेमकी कधी पार पडते हे पहावं लागणार आहे.