IMPIMP

Ajit Pawar | ‘…त्या उदयनराजेंवर मला काहीच बोलायचं नाही’ – अजित पवार

by nagesh
mp udayanraje bhosale open challenge to ncp leader ajit pawar

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज (सोमवारी) कार्यक्रमादरम्यान साताऱ्यातील खटाव येथे होते. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जंरडेश्वर कारखान्याबाबत मला काहीही बोलायचे नसल्‍याचे सांगत जे असेल ते नियमाप्रमाणे होईल. संपूर्ण राज्‍याला माहितेय मी नियमाप्रमाणे वागणारा माणूस आहे. जे काही लोक माझ्‍याबाबत बोलतात, मला असल्‍या लोकांनाही उत्तर द्यायचे नाही. असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्‍यांनी (Kirit Somaiya) जरंडेश्‍‍वर सहकारी साखर कारखान्‍याच्‍या अनुषंगाने आरोप केले होते. त्यावरुन वातावरण तापले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

खटाव येथील कार्यक्रमानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांना खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केलेल्‍या टीकेबाबत विचारले असता. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, मला त्‍यावर काहीच बोलायचे नाही. विकासावर बोलू की, अशी प्रतिक्रिया देखील अजित पवार यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी सातारा जिल्‍हा बँकेबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. जिल्‍हा बँकेबाबत (Satara District Bank Election) विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde), मकरंद पाटील (Makrand Patil) हे निर्णय घेतील. असं देखील म्हटलं आहे.

जिल्‍हा बँकेत महाविकास आघाडीचा पॅटर्न राबवणार का, असं विचारलं असता. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्‍ही राज्‍याचे बघत असतो. स्‍थानिक पातळीवरचा निर्णय स्‍थानिक पदाधिकारी घेत असतात. जिल्‍हा बँकेबाबत रामराजे व इतर सहकारी निर्णय घेतील. असं ते म्हणाले. दरम्यान, पुढे पवार (Ajit Pawar) म्हणाले की, सहकार चळवळ स्‍व. यशवंतराव चव्‍हाण व इतर पदाधिकाऱ्यांनी स्‍थापन केली. त्‍यावेळी सहकार योग्‍य लोकांच्‍या हातात होता. नंतरच्‍या काळात त्‍यात इतर शिरले. व्‍यावसायिक दृ‍ष्‍टिकोन तसेच शिस्‍त न बाळगल्‍याने सहकार गोत्‍यात आला आहे. यापुढील काळात सभासदांनी चांगल्‍या लोकांच्‍या ताब्‍यात कारखाने द्यायला पाहिजेत. कारखानेच नाहीत तर इतर सहकारी संस्‍थाही चांगल्‍या विचारांच्‍या व्‍यक्‍तींच्‍या ताब्‍यात देणे आवश्‍‍यक असल्याचं ते म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar dont want to talk about mp udayanraje bhosale satara news

हे देखील वाचा :

CNG Price Pune | पेट्रोल डिझेल पाठोपाठ आता CNG त 2 रुपयांनी वाढ भाववाढ; जाणून घ्या नवे दर

Shah Rukh Khan | ‘माझा मुलगा ‘ड्रग्ज’ आणि ‘सेक्स’ करू शकतो’, जेव्हा एका मुलाखतीमध्ये घसरली होती शाहरुख खानची जीभ; आता Video Viral

Pune Crime | ‘तू मोठा की मी मोठा’ ! भोरमध्ये पुण्यातील तरुणाचा दगडाने ठेचून खून, नुकताच आला होता कारागृहातून बाहेर

Related Posts