IMPIMP

Ajit Pawar | ‘रात्री कोण कुठं फिरतंय, गार्डनमध्ये गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार’ – अजित पवार

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra assembly winter session 2022 cm eknath shinde reply opposition leader ajit pawar over maharashtra karnataka border issue

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध
विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील पक्षाच्या पदवाटप आणि कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना शहरात वाढवलेल्या सीसीटीव्ही (CCTV)
च्या जाळ्याविषयी अजित पवारांनी मिश्किल टोलेबाजी केली. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, रात्री कोण कुणासोबत कुठं फिरतंय, कसं फिरतंय,
गार्डनमध्ये कोण गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार आहे. कारण पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) सीसीटीव्हीचं जाळं उभारलं आहे. सीसीटीव्ही माध्यमातून कुठल्या बहादराचं काय चाललंय, हे आता मला कळेल, अशी मिश्किल टोलेबाजी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते आज ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय हॉकी प्रशिक्षण केंद्राचे (International Hockey Training Center) उद्घाटन तसंच उद्योग सुविधा कक्ष व औद्योगिक सामाजिक उत्तरदायित्व कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरामध्ये गृह खात्याच्या वतीने 88 चौकांमध्ये 287 कॅमेरे आणि मनपाच्या (PCMC) वतीने 2200 कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे शहरात 7 हजार 600 कॅमेरे बसणार आहेत. तुम्ही रात्री कुठे जाता, दिवसा कुठे जाता, कुणाबरोबर फिरता, काय करता गार्डनमध्ये कुठं आणि कुणासोबत गुलूगुलू करता, सगळं कळणार आहे…, अशा कोपरखळ्या अजित पवार यांनी उपस्थित तरुण कार्यकर्त्यांना मारल्या.

जो गुंडगिरी करत असेल, जो दहशत करत असेल तर तो कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असेल, त्याचा आम्ही विचार करणार नाही. त्याच्यावर जर चार – पाच केसेस दाखल झाल्या तर त्याला आम्ही तडीपार करु. तडीपार करुनही शहाणा जागेवर आला नाही तर थेट मोक्का (MCOCA) Mokka लावू, याशिवाय गत्यंतर नाही. आम्हाला कारण नसताना कुणाला त्रास द्यायचा नाही. आमच्या पोलीस यंत्रणेला इतरही बाकी भरपूर कामं आहेत. पण काहींच्या स्वभावात बदलच होत नसेल तर आम्ही त्यावर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar funny speech at pimpari chinchawad

हे देखील वाचा :

Pune Crime | तरुणीकडून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी, विवाहित तरुणाची आत्महत्या; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Maharashtra Police Crime News | धक्कादायक ! पोलिसानेच केला सहकारी महिलेवर बलात्कार, पोलीस दलात खळबळ

High Court Order On Corona Mask Rules | ‘विमानात मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’ – उच्च न्यायालयाचे आदेश

Related Posts