IMPIMP

Ajit Pawar | मुख्यमंत्रीपदाचा चार्ज कोणाला द्यायचा?; अजित पवार म्हणाले..

by nagesh
MLA Devendra Bhuyar | MLA devendra bhuyar on ajit pawar for cm maharashtra udhhav thackeray maharashtra politics

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Winter Session) काल (मंगळवारी) शेवटचा दिवस होता. अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांत खडाजंगी पाहायला मिळालं. या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांची अनुपस्थिती होती. याच मुद्यावरुन विरोधक महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) निशाणा साधत होते. मुख्यमंत्र्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे सोपवावी असं विरोधक म्हणाले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही यावरुन टोला लगावला होता. मात्र, आता अजित पवारांनी टोला लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अजित पवार म्हणाले, ‘अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात येऊन पाहणी केली होती. तसेच विधिमंडळातील प्रत्येक विषयात ते मार्गदर्शनही करत होते. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ते येणार होते, पण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना न येण्याची विनंती केली. असं पवार अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. तसेच, ‘आमच्यात चार्ज कोणी द्यायचा आणि कोणी घ्यायचा ते आम्ही ठरवू. बाहेरच्यांनी उगाच त्यात नाक खुपसायचं काय कारण.’ असं माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांवर उत्तर दिलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले होते की, ‘मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणे साहजिक आहे.
पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य २ पक्षांवर अविश्वास असे स्वाभाविक आहे.
कारण पदभार घेतला तर सोडणार नाहीत.
पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेकडे (Aditya Thackeray) पदभार दिला पाहिजे.
तसेच, तसेच रश्मी वहिनींनाही चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकते. असंही पाटील यांनी म्हटलं होतं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar spoke clearly about post caretaker chief minister maharashtra uddhav thackeray

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील तरूणीला अश्लील मेसेज करणं कोल्हापुरातील युवकाला पडलं महागात, जाणून घ्या प्रकरण

MSEDCL Padmavati Substation | गुरुवारी पुण्यातील पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

Rule Change | 1 जानेवारीपासून LPG सिलेंडरच्या दरापासून डिजिटल पेमेंटच्या नियमापर्यंत होणार ‘हे’ 13 मोठे बदल; जाणून घ्या

Related Posts