IMPIMP

Ajit Pawar | ‘व्हय बाबा, आता मी ड्रायव्हर होतो, साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रिया तिकीटं फाडेल’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar to ncp party workers and other to baramati

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | बारामती तालुक्यातील (Baramati Taluka) जळगाव सुपे (Jalgaon Supe) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. ‘जांभळाच्या झाडाखाली बसायचं आ करून अन् जांभूळ थोबाडातच गेलं पाहिजे. खाली पडलं तर ते उचलून टाका, इतका आळशीपणा करायचा नाही. आम्ही सकाळी 6 वाजता कामाला सुरूवात करतो. तेंव्हा तर तुम्ही झोपला होता. सुविधा मिळाल्या पाहिजेत मात्र सगळं एकदम होत नाही. खुप सुविधा मिळाल्या तर त्याची किंमत राहत नाही. इंदापूर, पुरंदर, दौंड, फलटणची परिस्थिती पहा, आपली परिस्थिती पहा,” अशा कानपिचक्या पवार यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांना दिल्या.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”चांगल्या सुविधा देण्यासाठी माझा प्रयत्न आहे. का-हाटी येथे कृषी मुल शिक्षण संस्था आहे. तसेच सुपे येथे विद्या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सुविधा देण्यात येणार आहे, असे सांगताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी जळगाव सुपे पासून का-हाटी अंतर किती आहे, असा सवाल केला. यावर उपस्थितांनी 6 ते 7 किमी अंतर आहे, असं सांगितले. हा आढावा घेत असतानाच एकाने ‘येथे बस गाड्यांची सोय करावी’ अशी मागणी केली. ‘व्हय बाबा, आता मी ड्रायव्हर होतो. साहेबांना कंडक्टर करतो आणि सुप्रिया तिकीटं फाडेल,” असं अजित पवारांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हश्या पिकल्या.

दरम्यान, ”पूर्वी येथील परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये मोठा बदल झाला आहे.
परिस्थिती एकदम बदलत नसते. सध्या बस सोय नसेल तर तुमच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी मिळून गाडीची सोय करा.
साहेबांना काटेवाडीहून पुण्याला बसने डबा जायचा, 4 तासांनी तो डबा पोहचायचा, चटणी भाकरी खाऊन त्यांनी दिवस काढले.
आपण सुद्धा थोडं सहन केलं पाहिजे.” असं अजित पवार म्हणाले.

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar to ncp party workers and other to baramati

हे देखील वाचा :

Foods For Summer Season | उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा, होणार नाही त्रास; जाणून घ्या

Rajya Sabha Election 2022 | महाराष्ट्रातून राज्यसभेवर विनोद तावडे, पियुष गोयल?; भाजपच्या गोटात खलबतं

Sadabhau Khot on CM Uddhav Thackeray | ‘अडीच वर्षानंतर मुख्यमंत्री मास्क काढून चंद्रासारखा मुखडा दाखवणार’ – सदाभाऊ खोत

Related Posts