IMPIMP

Ajit Pawar | भाजपकडून अजित पवारांना घेरण्याची तयारी ? कंबोजांच्या ट्विटनंतर हालचालींना वेग, ‘ती’ केस पुन्हा ओपन होणार ?

by nagesh
Maharashtra Governement Holidays | next year maharashtra government employees got 24 holidays but ajit pawar offset on holidays

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भाजपचे नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांनी आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam) चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यामुळे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण मोहित कंबोज यांची सगळी ट्वीट्स आघाडी सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) हे जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) होते. यावेळी सिंचन प्रकल्पांची कामे देताना हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप अजित पवारांवर झाले होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान 2019 मध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे 80 तासांचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सिंचन घोटाळ्याची केस बंद केली होती. परंतु मोहित कंबोज यांच्या ट्विटनंतर आता ही केस पुन्हा ओपन होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी याबाबत संकेत दिले आहेत. दरेकरांनी अजित पवारांचे थेट नाव न घेतले असले तरी तो नेता कोण आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वाढली आहे.

प्रवीण दरेकर यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले की, एखाद्या नागरिकाने ट्विट केले तर एवढं गदारोळ करण्याचे कारण नाही. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) नेतेही सोशल मीडियावर आमच्यावर विखारी आणि कुत्सित टीका करतात. तेव्हा आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपतो आणि काही बोलत नाही. त्यामुळे कंबोज यांचे ट्विट कोणाला झोंबण्याचे कारण नाही. आपण निष्कलंक असू, आपला दोष नसेल तर आशाप्रकारचं ट्विट गंभीरपणे घेण्याचे कारण नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

सिंचन घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरु करणार का, असा प्रश्न दरेकरांना विचारण्यात आला.
यावर ते म्हणाले, गेल्या सरकारच्या काळातही सी समरी झालेल्या, बंद करण्यात आलेल्या केस पुन्हा ओपन करुन तपास करण्यात आला.
त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी होईल.
एखादा विषय प्रसारमाध्यमांतून चव्हाट्यावर आला, कोणी शंका उपस्थित केली असेल तर त्याला न्याय देणे संबंधित विषय धसास लावणे,
ही एक लोकप्रतिनीधी म्हणून आमची जबाबदारी आहे.
त्याच जबाबदारीच्या भावनेतून आम्ही सिंचन घोटाळ्याच्या विषयाला हात घालू.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज असल्याचे दरेकर म्हणाले.
यामुळे राज्यातील नवनियुक्त सरकार सिंचन घोटाळ्याची नव्याने चौकशी करण्याचे आदेश देणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : – Ajit Pawar | bjp mla pravin darker reaction on mohit kamboj tweet about irrigation scam ncp leader ajit pawar

हे देखील वाचा :

Jacqueline Fernandez | 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात ईडीकडून आरोपपत्र दाखल; जॅकलीन फर्नांडिस अडचणीत

Maharashtra Monsoon Session | MPSC आणि B.Ed CET परीक्षा एकाच दिवशी, सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

Pune Crime | बिटकॉईनमधील फसवणुकीचा आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस; 42 कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिटकनेक्टचे सतिश कुंभाणीसह 7 जणांवर FIR

Related Posts