IMPIMP

Ajit Pawar | ‘CM म्हणाले होते एकत्र लढू, पण…’, अजित पवारांनी सांगितलं नगरपंचायतींचे राजकारण

by nagesh
Ajit Pawar | CM uddhav thackeray chief minister had said that we will fight the elections together but it was not possible due to political issues ajit pawar

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइननगरपंचायतींचे आज निकाल (Nagar Panchayat Results) जाहीर झाले आहेत. या निकालानंतर
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी
(NCP), काँग्रेस (Congress) व शिवसेनेच्या (Shivsena) नेत्यांना नेहमी सांगत होते की, आपण अशा निवडणुकांना तिन्ही पक्ष एकत्र सामोरे जाऊ. मात्र,
कोरोना निर्बंध (Corona Restriction) आणि स्थानिक राजकिय मुद्यांमुळे ते शक्य झाले नाही. स्थानिक निवडणुकांमध्ये तेथील परिस्थिनुसार मतदान होते. मात्र, या निवडणुका पक्षांच्या चिन्हावर झाल्या आहेत. जे निवडून आले त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. नगरसेवकांना (Corporators) शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून (State Government) संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील नगरपंचायतींच्या निकालावर प्रतिक्रिया दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बारामती (Baramati) येथे आज (बुधवार) माध्यमांशी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, खरे तर महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्षांनी कोणत्याही ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार दिले नाहीत. चारही पक्षांनी आपले जास्तित जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी प्रयत्न केले. तिन्ही पक्षांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना जिल्हा पातळीवर कोणासोबत आघाडी करायची का स्वतंत्र लढायचे याचा निर्णय घेण्याची मुभा दिली होती, असेही पवार यांनी सांगितले.

12 आमदारांचे प्रकरण सुप्रीम कोर्टात
12 आमदारांच्या निवडीचे प्रकरण (12 Suspended MLA Case) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आहे.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते हे पाहावे लागेल. वास्तविक विधीमंडळाला देखील त्यांचे काही कायदे करण्याचा अधिकार आहे.
देशातल्या अनेक विधानसभांमध्ये अशा प्रकारचे निर्णय तेथील बहूमताच्या आधारे घेतले गेले आहेत.
त्यामुळे आज काय निर्णय लागतो हे पहावे लागेल. राज्य सरकारने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar | CM uddhav thackeray chief minister had said that we will fight the elections together but it was not possible due to political issues ajit pawar

हे देखील वाचा :

‘एकदम मोफत’ घ्यायचे असेल ‘रेशन’ तर घरबसल्या लिंक करा Aadhaar-Ration Card, मिळतील अनेक जबरदस्त फायदे

Raima Islam Shimu | प्रसिद्ध अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू बांगलादेशात बेपत्ता, पोत्यात सापडला मृतदेह

LIC IPO | देशातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी लगबग, डेडलाईनच्या पूर्वी दिवसरात्र एक करताहेत अधिकारी

Related Posts