IMPIMP

Ajit Pawar | अजित पवार यांचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आश्वासन; म्हणाले – ‘हंगाम संपत असला तरी…’

by nagesh
Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | ajit pawar reaction on eknath shinde uddhav thackeray shivsena dussehra melawa controversy

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | ‘कारखान्यांचा हंगाम संपत आला असला, तरी कारखाने सुरू ठेवून शिल्लक ऊसाचा प्रश्न निकाली
काढण्यात येईल,’ असं आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलं आहे. “कारखान्यांचा हंगाम संपत आला
असला, तरी राज्याबरोबर साताऱ्यातही शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत.’ असं अजित पवार
यांनी सांगितलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”यावर्षी पाऊस चांगला झाला झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्याबरोबरच हेक्टरी टनेजही वाढले आहे. सगळे कारखाने ऊस संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे परिस्थितीवर लक्ष आहे. ते रोज आढावा घेत आहेत. साताऱ्यात अजिंक्यतारा कारखाना जास्त दिवस चालेल अशी परिस्थिती आहे. असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. अजित पवार माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), मकरंद पाटील (Makrand Patil) आदी उपस्थित होते.

पुढे अजित पवार म्हणाले, “शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये यासाठी इतर कारखान्यांकडून या उसाचे गाळप करावे.
यासाठी 1 मे पासून वाहतूक अनुदान आणि रिकव्हरी लॉस दिला जात आहे.
सरकारकडून मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्याला दिले जातेय. शेतकऱ्याला चांगला दर मिळाला पाहिजे ही त्या मागची भूमिका आहे.
त्या-त्या विभागातील ऊस संपवण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे.”

Web Title :- Ajit Pawar | DCM and NCP leader ajit pawar assure sugarcane farmer in satara

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील मोठ्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेचा छापा; जागा मालक बाळासाहेब दांगट याच्याविरुद्ध FIR (व्हिडीओ)

Pune Crime | दुबईतून आलेल्या प्रवाशाकडून 26.45 लाखांचं सोनं जप्त, पुणे विमानतळावर कारवाई

Foods For Kidney Disease | किडनीचे ’सुरक्षा कवच’ आहेत ‘हे’ 5 फूड, विषारी पदार्थ बाहेर काढून बनवतात मजबूत

Related Posts