IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला कानपिचक्या; म्हणाले – ‘उगाच बारामती, बारामती करू नका; ते काय…’

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar expressed his displeasure over the stalled work of mumbai goa highway

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (MLA Dilip Mohite Patil) यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलताना विमानतळाबाबतचा उल्लेख केला. चाकण, खेड परिसरात विमानतळ झालं असत तर चाकण एमआयडीसीमध्ये (Chakan MIDC) आलिशान हॉटेल्स असते, मात्र, ते विमानतळ आता बारामतीला (Baramati) गेलं, किमान आम्हाला डोमॅस्टिक विमानतळ द्यावं,’ अशी विनंती मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली. यानंतर अजित पवार यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”आपल्याकडील काही नेत्यांनी विरोध करायला नको होता. विमानतळ झालं असत तर चेहरा मोहरा बदलला असता. आता ते विमानतळ बारामतीला करायचं ठरवलं आहे. विमानतळ झालं असत तर आणखी विकास झाला असता, अनेकांनी हॉटेलसाठी जागा घेतल्या होत्या. हॉटेलचे नामांकित ग्रुप या परिसरात आले असते. अजित पवार (Ajit Pawar) यांना विनंती आहे की, आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बारामतीला गेलं त्याचा आनंद आहे. निदान डोमेस्टिक विमानतळ व्हावं. लोहगावच विमानतळ हे लष्कराचे आहे. त्यामुळं खेड, चाकण परिसरात विमानतळ व्हावं ही मागणी आहे. याबाबत अजित पवार यांनी मला शब्द दिलाय आणि ते पाळतात हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती असल्याचं,” आमदार मोहिते पाटील म्हणाले.

यानंतर अजित पवार म्हणाले, ”एअरपोर्ट बारामतीला नेलं जाणार नाही. कारण नसताना उगाच बारामती, बारामती करू नका. एअरपोर्टच्या बाबतीत हवाई उड्डाण सर्व्हे करत, संरक्षण विभाग मान्यता देत. कारण इथं लष्कराच्या विमानांना सराव करायचा असतो. दोन- दोन विमानतळ देता येत नाही, एक विमानतळ होता- होता नाकी नऊ आलेत, किती वर्षे झालं हा विषय सुरू आहे. हे काय खेळण्यातील विमानतळ आहे का? की अजून एक विमानतळ द्या. अस होत नाही, कृपया गैरसमज करून घेऊ नका.” असं ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad), पुणे (Pune) हे दोन्ही शहर जगाच्या नकाशात एकच आहेत म्हणून ओळखले जातात.
उद्योपतींना स्वतः च प्लेन घेऊन उतरता आलं पाहिजे, दिवसभर काम करून त्याला जाता आलं पाहिजे.
अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी करायचं ठरवलं आहे. त्याकडे माझं बारकाईने लक्ष आहे.
मुंबईच्या विमानतळावरील लोड कमी करायचं चाललं आहे.
पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची नितांत गरज आहे.
ते कुठं व्हावं, हवाई उड्डाण मंत्रालय (Ministry of Aviation) पाहणी करतय.” असं देखील अजित पवार यांनी सांगितलं.

Web Title :- Ajit Pawar | deputy chief minister and ncp leader ajit pawar slam his partys mla dilip mohite patil over airport issue

हे देखील वाचा :

SBI Declare Dividend | SBI मध्ये इन्व्हेस्ट करणार्‍यांना प्रॉफिटच Profit, प्रत्येकाला मिळेल इतका डिव्हिडेंट!

Summer Health Tips | जाणून घ्या उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची कारणे, परिणाम आणि प्रतिबंध उपाय

Bad Habits For Ear Health | ‘या’ 4 सवयींमुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो परिणाम; ‘या’ पध्दतीच्या चूका करण्यासाठी राहा दूर, जाणून घ्या

Related Posts